For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पाकिस्तान-तालिबान यांच्यात गोळीबार

06:13 AM Sep 10, 2024 IST | Tarun Bharat Portal
पाकिस्तान तालिबान यांच्यात गोळीबार
Advertisement

तालिबानचे 8 सदस्य ठार : मृतांमध्ये कमांडर सामील

Advertisement

वृत्तसंस्था/ पेशावर

अफगाणिस्तानातील तालिबानी राजवट आणि पाकिस्तान यांच्यात भीषण गोळीबार झाला आहे. या गोळीबारात तालिबानचे 8 सदस्य मारले गेले असून 16 जण जखमी झाले आहेत. खोस्त प्रांता सीमेवर दोन्ही बाजूने गोळीबार सुरू झाला जो चार तासांपर्यंत चालला आहे. मृतांमध्ये अफगाण तालिबानचे 2 वरिष्ठ कमांडर खलील आणि जान मुहम्मद यांचा समावेश आहे. तर पाकिस्तानचे किती सैनिक मारले गेले याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

Advertisement

यापूर्वी पाकिस्तान-तालिबान यांच्यात 4 सप्टेंबर रोजी रात्री गोळीबार झाला होता. तालिबानची राजवट पाकिस्तानला लागून असलेल्या सीमावर्ती भागांमध्ये नव्या चौक्यांची निर्मिती करत आहे. याचमुळे पाकिस्तानसोबत त्याचा संघर्ष होत आहे.

पाकिस्तान आणि अफगाणिस्तानला एक काल्पनिक डूरंड रेषा वेगळी करते. परंतु अफगाणिस्तान या डूरंड रेषेला मान्यता देत नाही. पश्तून समुदायाची विभागणी करण्यासाठी ब्रिटिश अधिकाऱ्यांनी ही सीमा निश्चित केली होती असे म्हणत अफगाणिस्तानने याला विरोध दर्शविला आहे.

तालिबानची राजवट डूरंड रेषेला मान्यता देईल अशी अपेक्षा पाकिस्तानला होती. परंतु असे घडले नाही. तालिबानने जुन्या सरकारची भूमिका कायम ठेवत सीमावर्ती भागांवर स्वत:च दावा सांगितला आहे. याचबरोबर तालिबान राजवटीने या भागांमध्ये नव्या चौक्या निर्माण करण्याचे सत्र आरंभिले आहे.

इम्रान खान जबाबदार

ब्रिटन दौऱ्यावर असलेले पाकिस्तानचे उपपंतप्रधान इशाक डार यांनी अफगाण सीमेवरील या स्थितीसाठी इम्रान खान जबाबदार असल्याचा दावा केला. मागील इम्रान सरकारने तालिबानचे समर्थन करण्यासाठी आणि अशरफ गनी सरकारला सत्तेवरून हटविण्यासाठी अशा अनेक दहशतवाद्यांची मुक्तता केली, जे आता पाकिस्तानसाठी संकट ठरले आहेत. हे दहशतवादीच बलुचिस्तानात पाकिस्तानी सैनिकांना लक्ष्य करत आहेत. एक कप चहा पिण्यासाठी काबूल येथे गेलेला थ्री स्टार जनरलच्या निर्णयांमुळे देशाला मोठे नुकसान झाले असल्याचे म्हणत डार यांनी आयएसआयच्या माजी प्रमुखांना लक्ष्य केले. डार यांनी जनरल हमीद यांना उद्देशून ही टिप्पणी केली आहे. हमीद हे काबूलमध्ये तालिबानच्या पदाधिकाऱ्यांसोबत चहा पिताना दिसून आले होते.

Advertisement
Tags :

.