For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शहर भाजपच्यावतीने फटाक्यांची आतषबाजी

12:20 PM May 05, 2026 IST | Tarun Bharat Portal
शहर भाजपच्यावतीने फटाक्यांची आतषबाजी
Advertisement

बेळगाव : पश्चिम बंगाल, आसाम व पुद्दुचेरी येथे भाजपने घवघवीत यश संपादन करून एकहाती सत्ता मिळविली आहे. या पार्श्वभूमीवर शहर भाजपच्यावतीने बाईक रॅली काढून जल्लोष करण्यात आला. राणी चन्नम्मा सर्कलमध्ये मिठाईचे वाटप करत फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. विजय मिळाल्यानंतर कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत उत्साहात रॅलीत सहभाग नोंदविला होता. भाजपच्या या यशामुळे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून आगामी निवडणुकांसाठी पक्ष अधिक जोमाने काम करेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

Advertisement

Advertisement
Tags :

.