फायरहॉक रॅप्टर पक्षी
याच्या नावामागे आहे कहाणी
ब्लॅक काइट नावाचा रॅप्टर म्हणजेच शिकारी पक्ष्याला अत्यंत चतूर मानले जाते. दाट रंगांचे पंख असलेले शरीर, काळ्या रंगाचा पंजा असलेल्या ब्लॅककाइटला भारतात वेगवेगळी नावे मिळाली आहेत. उत्तर भारतातील काही भागांमध्ये याला चील असे संबोधिले जाते.
तर ब्लॅक काइट नावाचा पक्षी स्वत:च्या चोचेतून पेटणारे लाकूड उचलून दूर जंगलातील कोरड्या भागाला जाळण्याचे काम करतो. एका खास उद्देशाने हा पक्षी जंगलात आग लावत असतो. एका संशोधनानुसार ब्लॅक काइट पक्षी स्वत:च्या शिकारीला मारून खाण्यासाठी आग लावतो. हा पक्षी खासकरून सरडे, अन्य पक्षी, छोटे सस्तन प्राणी आणि किडे देखील खात असतो. याच्या याच वैशिष्ट्यामुळे याला फायरहॉक रॅप्टर नावाने ओळखले जाते.
ब्लॅक काइट ऑस्ट्रेलियात सर्वाधिक आढळून येतो. याचबरोबर हा पक्षी भारतासमवेत आशिया, युरोप आणि आफ्रिकेतही दिसून येतो. ब्लॅक काइट स्वत:च्या घरट्यांमध्ये घुसखोरी करणाऱ्या पक्ष्यांपासून माणसांची ओळख पटवत त्यांच्यावर हल्ला करतो. या पक्ष्यांचे वैशिष्ट्या म्हणजे नर आणि मादी आयुष्यभर एकत्र राहतात. जंगलांमध्ये आग लावून शिकार करणे याचे वैशिष्ट्या आहे. या वैशिष्ट्यामुळेच याला फायरहॉक रॅप्टर नावाने देखील ओळखले जाते.