महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

अग्निशामक दलात गोवा मुक्ती दिन साजरा

12:35 PM Dec 20, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पणजी : अग्निशमन आणि आपत्कालिन सेवा खात्याच्या मुख्यालयात गोवा मुक्ती दिन साजरा करण्यात आला. पोर्तुगीजांच्या पारतंत्र्यातून गोवा  19 डिसेंबर 1961 झाला. तो एक उत्सव म्हणून आणि स्वातंत्र्यसैनिकांच्या बलीदानाची आठवण म्हणून दरवर्षी 19 डिसेंबर रोजी गोवा मुक्ती दिन साजरा केला जातो. प्रत्येक गोव्याच्या हृदयात देशभक्ती जागृत करणारा हा सोहळा राज्यभर साजरा केला जातो. यावेळी अग्निसामक दलाचे संचालक नितीन व्ही. रायकर यांनी सांतिनेज येथील अग्निशमन दलाच्या मुख्यालयात तिरंगा फडकावला आणि विभागातील सर्व अग्निशमन कर्मचार्यांना अभिवादन केले. यावेळी त्यांनी गोवा मुक्ती दिनाचे महत्त्व सांगितले. गोव्याला पोर्तुगीज राजवटीतून मुक्त करण्याच्या चळवळीत सहभागी झालेल्या सर्वांचे धैर्य आणि गोवा मुक्तीसाठीचे योगदान सर्वांनी लक्षात ठेवावे असे आवाहन केले. राष्ट्रध्वज कायम उंच ठेवण्यासाठी जवानांनी समर्पित वृत्ती आणि निष्ठेने काम करावे आणि समाजाची सेवा करावी असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी त्यांनी उप अधिकारी शिवराम के. नाईक, अग्निशमन दलाचे अग्रगण्य अग्निशामक विष्णू बी. गवस, आणि अग्निशामक नितेश जी. पागी या अग्निशमन दलाच्या गुणवंतांना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते मुख्यमंत्री अग्निशमन सेवा पदक मिळाल्याबद्दल अभिनंदन केले.तसेच तळेगाव येथील विद्यापीठ मैदानावर आयोजित गोवा राज्य मुक्ती दिनाच्या संचालनामध्ये सहभागी झालेल्या अग्निशमन दलाच्या तुकडीचे अभिनंदन केले.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article