५ जून रोजी मालवणात अग्निशमन केंद्र व कर्मचारी निवासस्थान इमारतीचे लोकार्पण
मालवण | प्रतिनिधी : जिल्हा वार्षिक योजना अग्निशमन सेवाबळकटी अंतर्गत सुमारे दोन कोटी मंजूर निधीतून उभारणी करण्यात आलेल्या मालवण नगरपरिषद अग्निशमन केंद्र व कर्मचारी निवासस्थान इमारतीचा लोकार्पण सोहळा आमदार निलेश राणे यांच्या हस्ते 5 जुन रोजी संपन्न होणार आहे. याबाबत माहिती माजी नगरसेवक दीपक पाटकर यांनी दिली आहे.मालवण नगरपरिषद परिसरात अग्निशमन कर्मचारी निवासस्थान इमारत बांधकाम करणे फेज 1 (विंग ए) या इमारतीची उभारणी करण्यात आली आहे. तळमजल्यावर सुसज्ज अग्निशमन वाहन पार्किंग सुविधा, तळमजला उर्वरित भाग अग्नीशमन केंद्र कार्यालय, स्टोअर रूम आणि नियंत्रण कक्ष, पहिला मजला वेटिंग रूम, रेस्ट रूम आणि ऑफिस. तर दुसरा मजला दोन प्रशस्त टू बीएचके रूम (अधिकारी निवासस्थान) असे इमारतीचे स्वरूप आहे. या इमारतीचे लोकार्पण आमदार निलेश राणे यांच्या हस्ते शुक्रवार 5 जुन रोजी संपन्न होणार आहे. अशी माहिती दीपक पाटकर यांनी दिली आहे.