कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

अग्नितांडव प्रकरण उच्च न्यायालयात

01:22 PM Dec 10, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पणजी : हडफडे येथील बर्च बाय रोमियो लेन नाईट क्लबला लागलेल्या आगीची सखोल चौकशी करण्यासाठी न्यायालयाच्या देखरेखीखाली विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्याची मागणी करणारी जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली असून 16 डिसेंबरला सुनावणी होणार आहे. ऐश्वर्या अर्जुन साळगावकर यांनी ही याचिका दाखल केली आहे. सरकारी अधिकाऱ्यांनी केलेल्या कथित बेकायदेशीर बांधकाम, परवाना उल्लंघन आणि त्रुटींची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच सर्व नाईट क्लब आणि तत्सम व्यावसायिक आस्थापनांचे राज्यव्यापी अग्निसुरक्षा ऑडिट करण्याची विनंती करण्यात आली आहे.

Advertisement

याचिकेत राज्य सरकार, नगर नियोजन खाते, जलस्रोत खाते, अग्निशामक दल, गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळ, हडफडे ग्रामपंचायत, बार्देशचे मामलेदार, बार्देश तालुक्याचे उपजिल्हाधिकारी, उत्तर गोवा पोलीस अधीक्षक, पोलिस महासंचालक, गोवा आपत्कालीन व्यवस्थापन प्राधिकरण आणि ‘मेसर्स बिईंग एफसी पॅसिफिक हॉस्पिलिटी प्रा.लि.’ यांना प्रतिवादी करण्यात आले आहे. याचिकेत नमूद करण्यात आले आहे, की बागा येथील कोस्टल नाईट क्लब, बर्च बाय रोमियो लेन येथे 6 डिसेंबरच्या मध्यरात्रीनंतर आग लागली.  या दुर्घटनेत 20 कर्मचारी आणि पाच पर्यटकांसह 25 जणांचा मृत्यू झाला, ज्यामुळे ही राज्यातील सर्वात भीषण आगीच्या घटनांपैकी एक ठरली. सदर क्लब कोणत्याही कायदेशीर परवानगीशिवाय आणि मान्यतेशिवाय कार्यरत होता. या दुर्घटनेला स्थानिक पंचायत आणि जिल्हा प्रशासन जबाबदार आहे. या जनहित याचिकेत दुर्घटनेला जबाबदारी सुनिश्चित करण्यासाठी आणि विनाशकारी घटनेला कारणीभूत असलेल्या परिस्थितीची सखोल चौकशी करण्यासाठी न्यायालयीन देखरेखीची विनंती करण्यात आली आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article