मुलींच्या वसतिगृहाला आग, तामिळनाडूत दोघींचा मृत्यू
07:00 AM Sep 13, 2024 IST
|
Tarun Bharat Portal
Advertisement
मदुराई : तामिळनाडूतील मदुराई येथील कात्रपलायम येथील मुलींच्या वसतिगृहात गुऊवारी सकाळी आग लागली. या अपघातात दोघींचा मृत्यू झाला. तसेच अन्य दोघी जखमी झाल्या आहेत. त्यांना उपचारासाठी ऊग्णालयात दाखल करण्यात आले. दुर्घटनेच्यावेळी वसतिगृहात 40 हून अधिक विद्यार्थिनी होत्या. आगीमागील नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. याप्रकरणी वसतिगृह मालकाची चौकशी करण्यात येत असून संबंधितांवर योग्य कारवाई केली जाईल, असे मदुराईचे जिल्हाधिकारी एम. एस. संगीता यांनी सांगितले.
Advertisement
Advertisement
Advertisement
Next Article