For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कुडाळ डॉन बॉस्को चर्चच्या इमारतीला आग

09:15 AM Aug 19, 2025 IST | अनुजा कुडतरकर
कुडाळ डॉन बॉस्को चर्चच्या इमारतीला आग
Advertisement

कुडाळ / प्रतिनिधी

Advertisement

कुडाळ आंबेडकरनगर येथील डॉ.आंबेडकर पुतळ्या समोर असलेल्या डॉन बॉस्को चर्चच्या इमारतीला मंगळवारी सकाळी सातच्या सुमारास आग लागली.कुडाळ नगरपंचायत व एमआयडीसी अग्निशामक पथकाने दलाच्या पथकाने आग आटोक्यात आणली.आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.हॉल मध्ये प्लॅस्टीकच्या खुर्च्या एकत्रित करून ठेवण्यात आल्या होत्या.त्यांच्यावर असलेल्या स्वीच बॉक्स मध्ये शॉर्टसर्किट झाल्याने खालील खुर्च्यांनी पेट घेतला.त्यामुळे आग भडकली व वरचे सीलिंग व छपराने पेट घेतला.नगरपंचायतीचे कर्मचारी दिपक कदम तेथे कर्मचाऱ्यांना ड्यूटी लावण्यासाठी आले होते त्यांना धूर व आग दिसल्याने त्यांनी लागलीच कुडाळ नगरपंचायतीच्या अग्निशामक दलाचे गजा पेडणेकर व संजय टेंबुलकर यांना पाचारण केले. कुडाळ तसेच एमआयडिसी दोन्ही बंब घटणास्थळी दाखल झाले. त्यांनी आग आटोक्यात आणली. कुडाळच्या नगराध्यक्ष सौ प्राजक्ता बांदेकर यांना माहिती मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली चर्चच्या फादर व इतर पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून माहिती घेतली. तसेच नगरसेवक गटनेते विलास कुडाळकर हे घटनास्थळी दाखल झाले.

Advertisement
Advertisement
Tags :

.