कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

सातार्डा येथील सेंट्रल बँक ऑफ़ इंडियाच्या शाखेत आग

02:54 PM May 23, 2025 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

आगीत जुनी कागदपत्रे जळून खाक

Advertisement

सातार्डा -

Advertisement

सातार्डा येथील सेंट्रल बँक ऑफ़ इंडियाच्या शाखेत गुरुवारी रात्री 10:30 वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. बँकेच्या पहिल्या मजल्यावर लागलेल्या आगीमध्ये जुनी कागदपत्रे जळून खाक झाली. शॉर्ट सर्किटने आग लागल्याचे समजले. आग विझविण्यासाठी देऊळवाडी, घोगळवाडीतील तरुणांनी शर्थीचे प्रयत्न केल्याने मोठा अनर्थ टळला आहे.गुरुवारी रात्री सेंट्रल बँकेच्या दुसऱ्या मजल्यावर आग लागल्याचे ग्रामस्थांना दिसले. आग लागल्याचे समजताच परिसरातील तरुणांनी सेंट्रल बँकेच्या दुसऱ्या मजल्यावर धाव घेतली. बँकेचा लाकडी दरवाजा तोडून तरुण आग विझविण्यासाठी लगबगीने आत शिरले. आगीचा वणवा मोठा होता. आग आटोक्यात आणण्यासाठी सेंट्रल बँकेच्या लगत घर असलेल्या दादा घाडी यांचा मोटरपंप वापरून पाणी मारण्यात आले. आग विझविण्यासाठी तरुणांनी प्रयत्न केल्यानंतर तासाभराने आग नियंत्रणात आली.तरुणांच्या प्रसंगवधनाने मोठा अनर्थ टळला. अन्यथा सेंट्रल बँकेच्या तळमजल्यावर फर्निचरचे ऑफिस व बाजूला ए टी एम मशीन आहे.पोलिसांनी घटना स्थळाची पाहणी केली.आग लागल्याचे समजताचक्षणी सामाजिक कार्यकर्ते आपा राऊळ, ग्रामपंचायत सदस्य वासुदेव राऊळ, चंद्रशेखर प्रभू, अक्षय पेडणेकर जयेश तुळसकर, नितीन मांजरेकर,यतीन घाडी, सोनेश सातार्डेकर, संदेश सातार्डेकर,आत्माराम घाडी, प्रथमेश पेडणेकर यांनी पुढे सरसावत आग विझवली .

Advertisement
Tags :
# tarun bharat sindhudurg # news update # satarda # konkan update # marathi news # fire # bank of india branch #
Next Article