For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आचरा येथील हार्डवेअर दुकानला भीषण आग

12:09 PM Nov 12, 2024 IST | अनुजा कुडतरकर
आचरा येथील हार्डवेअर दुकानला भीषण आग
Advertisement

आगीत दुकानातील पूर्ण माल जळून खाक

Advertisement

आचरा | प्रतिनिधी

आचरा वरचीवाडी येथील आचरा - मालवण मार्गांवर असलेल्या भक्ती हार्डवेअर दुकानाला पहाटेच्या सुमारास आग लागली. लागलेल्या आगीत दुकानातील साहित्य अक्षरशः जळून खाक झाले. पहाटे मॉर्निंगवॉकला जाणाऱ्या ग्रामस्थांना या दुकानाला आग लागल्याचे लक्षात येताच त्यांनी दुकान मालक विनोद गवळी व स्थानिकांना माहिती दिली. स्थानिकांनी धाव घेत आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न चालू होते केले होते. यावेळी मालवण नगरपालिकेचा अग्निशमन बंबही पाचारण करावा लागला होता. स्थानिक ग्रामस्थांच्या प्रसंगावधानामुळे सुदैवाने या इमारतीलगतच्या दुकानांना आगीची झळ बसली नाही. अन्यथा मोठी हानी होण्याची शक्यता होती. लागलेली आग दोन तासाच्या अथक प्रयत्नानंतर आटोक्यात आली होती. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सुमारे सव्वा कोटी रुपयाचे नुकसान झाले असल्याची माहिती दुकान मालक विनोद गवळी यांनी दिली. घटनेची माहिती मिळताच आचरा पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते.

Advertisement

आग लागल्याचे समजताच आचरा सरपंच जेरॉन फर्नांडीस,अभिजित सावंत, विजय कदम, उपसरपंच संतोष मिराशी, मुबंई येथील अग्निशामक दलाचे सेवानिवृत्त कर्मचारी सुहास हडकर, विद्यानंद परब, माणिक राणे, राजन पुजारे, जयप्रकाश परुळेकर, राजन गांवकर, मुजफ्फर मुजावर, दिलीप कावले व अन्य ग्रामस्थांनी धाव घेत आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न चालू केले होते. आग विझवताना पाण्याचा तुटवडा निर्माण झाला होता यावेळी माजी सरपंच मंगेश टेमकर, ग्रामपंचायत सदस्य चावलं मुजावर यांनी आग विझवण्यासाठी पाणी उपलब्ध करून दिले.

Advertisement
Tags :

.