For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सौदी अरेबियच्या रिफायनरीला आग

01:09 AM Jul 28, 2026 IST | Tarun Bharat Portal
सौदी अरेबियच्या रिफायनरीला आग
Advertisement

वृत्तसंस्था

Advertisement

रियाध

सौदी अरेबियातील अॅबक्वेक या जगातील सर्वात मोठ्या समजल्या जाणाऱ्या तेलशुद्धीकरण केंद्राला भीषण आग लागली आहे. या तेलशुद्धीकरण केंद्रात कच्च्या इंधन तेलाच्या स्थिरीकरणाचे काम केले जाते. या केंद्रावर ड्रोन्सने हल्ला करण्यात आला होता. काही ड्रोन्स या तेलशुद्धीकरण केंद्रावर पडल्याने ही आग लागली, अशी प्राथमिक माहिती उपलब्ध झाली आहे. हा ड्रोन हल्ला कोणी केला याचा तपास केला जात आहे. इराणने थेट हा हल्ला केलेला नसल्याचे दिसून आले आहे. तथापि, इराकमधील इराणसमर्थित संघटनांकडून हा हल्ला झाल्याचे प्रथमदर्शनी समजत आहे. या केंद्राला आग लागल्याने सौदी अरेबियाच्या तेल उत्पादनात घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या केंद्राची उपग्रहीय छायाचित्रे प्रसिद्ध झाली आहेत. या छायाचित्रांमधूनही या आगीची भीषणता दिसून येत आहे. अद्यापही आगीवर नियंत्रण मिळविणे सौदी अरेबियाला शक्य झालेले नाही. तथापि, आग विझविण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर केले जात आहेत. आखातातील आतापर्यंतच्या संघर्षात सौदी अरेबियावरचा हा सर्वात मोठा हल्ला झाला आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.