For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बिदरमधील गुरुनानक इस्पितळात आग, सुदैवाने जीवितहानी टळली

11:53 AM Apr 30, 2026 IST | Tarun Bharat Portal
बिदरमधील गुरुनानक इस्पितळात आग  सुदैवाने जीवितहानी टळली
Advertisement

रुग्णांना सुरक्षितस्थळी हलविले

Advertisement

बेंगळूर : बिदरमधील गुरुनानक इस्पितळात आग लागल्याची घटना बुधवारी घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. आग लागल्याचे समजताच तेथील रुग्णांना तातडीने सुरक्षितस्थळी हलविण्यात आले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे प्राथमिक तपासातून समजते. इस्पितळातील सर्व रुग्ण आणि कर्मचारी सुरक्षित असल्याची माहिती बिदर उपायुक्त शिल्पा शर्मा यांनी दिली. बिदरमधील गुरुनानक इस्पितळाच्या कार्यालयीन विभागातून दाट धूर येत असल्याने कर्मचाऱ्यांनी तेथे धाव घेतली. घटनेनंतर रुग्णांना तातडीने रुग्णवाहिकेतून सरकारी इस्पितळात हलविण्यात आले. तसेच इतर साहित्य सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाचे दोन बंब घटनास्थळी दाखल झाले. 20 कर्मचाऱ्यांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर आग नियंत्रणात आणण्यात यश आले.

Advertisement
Advertisement
Tags :

.