महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

कुंकळ्ळीत डिमॅक इंडस्ट्रीजला आग

12:02 PM Feb 12, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

लाखो ऊपयांचे नुकसान, शॉर्ट सर्किटमुळे आग

Advertisement

मडगाव : कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीतील डिमॅक इंडस्ट्रीजमध्ये शनिवारी रात्री उशिरा आगीची घटना घडली. कुंकळ्ळी अग्निशामक दलाने मशिनरीवर पाण्याचा मारा करून आगीवर नियंत्रण मिळविले. ही आग नेमकी कशामुळे लागली हे स्पष्ट झाले नसले तरी शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असण्याची व्यक्त केली जात आहे. आगीत कंपनीतील मशिनरीसह संगणक, टेबल, खुर्च्या अशा साहित्यासह लाखो ऊपयांचे नुकसान झाले आहे. कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीतील सिंडीज आयस्क्रीम पॅक्टरीनजीक असलेल्या डिमॅक इंडस्ट्रीजमधील मशिनरीला आग लागण्याची घटना शनिवारी रात्री सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास घडली. आगीची माहिती कुंकळ्ळी अग्निशामक दलाला मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली व अगोदर वीजपुरवठा खंडित केला. त्यानंतर मशिनरीवर पाण्याचा फवारा मारुन आग नियंत्रणात आणण्यात यश मिळविले. डिमॅक इंडस्ट्रीजमध्ये मिनरल वॉटर बॉटल्समध्ये पाणी भरण्यात येत होते. या बॉटल्स प्लास्टिकच्या असल्याने आग त्वरित भडकली. सुमारे दीड तासांच्या प्रयत्नांनंतर रात्री साडेअकरा वाजता आगीवर नियंत्रण आणले. या आगीमध्ये पाणी बाटल्यांमध्ये भरण्याचे मशिन, बाटल्या, सीलबंद करण्याची मशिन, पाणी बाटलीवर लेबल लावण्याचे मशिन यासह इतर मशिन्स व दोन संगणक, दोन टेबल, खुर्च्या असे साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. यात लाखो ऊपयांचे नुकसान झाले. कुंकळ्ळी अग्निशामक दलाचे स्टेशन अधिकारी तृप्तेश नाईक यांच्यासह नीलेश नाईक, रमण गावकर, हरी पावसकर, सिद्धांत आरोलकर, सौरभ शेटकर यांनी आग विझविण्यासाठी योगदान दिले.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article