महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

काकोडा औद्योगिक वसाहतीतील प्रकल्पाला आग

06:35 AM Oct 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

कोट्यावधींची हानी  : गौरी पॅकेजिंग इंडस्ट्री युनिटमधील सर्व माल खाक, अग्निशामक दलाकडून 13 बंबांचा वापर 

Advertisement

प्रतिनिधी/ कुडचडे

Advertisement

कुडचडे-काकोडा औद्योगिक वसाहतीमधील गौरी पॅकेजिंग इंडस्ट्री युनिटला शनिवारी पहाटे 4 वा. आग लागून कोट्यावधींचे नुकसान होण्याची घटना घडली.  ही आग पूर्णपणे आटोक्यात येईपर्यंत संध्याकाळचे 7 वाजले. कुडचडे अग्निशामक दलाच्या कार्यालयातून मिळालेल्या माहितीप्रमाणे, सदर घटनेची माहिती अंदाजे पहाटे 4.32 मिनिटाच्या दरम्यान त्यांना मिळाली होती. त्याबरोबर अग्निशामक दलाने घटनास्थळी लगेच धाव घेऊन सदर कंपनीच्या मालाला लागलेली आग विझविण्याचा प्रयत्न सुरू केला.

सदर प्रकल्पातील कागदी मालाला लागलेली आग आटोक्यात येत नसल्यामुळे ती बुजविण्यासाठी नंतर मडगाव, कुंकळ्ळी, फोंडा येथील अग्निशामक दलाचे बंब बोलावण्यात आले. सदर आग आटोक्यात आणण्यासाठी शनिवारी संध्याकाळी 7 पर्यंत एकूण 13 बंब वापरण्यात आल्याची माहिती मिळाली. याकामी अग्निशामक दलाच्या एकूण 37 जवानांनी प्रयत्न केला. त्यात कुडचडे अग्निशामक दलाच्या 22 जवानांचा सहभाग राहिला.

कुडचडे अग्निशामक दलाचे स्टेशन फायर ऑफिसर दामोदर जांबावलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली जवानांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. एकूण 13 तासांनंतर आग पूर्णपणे आटोक्यात आणली गेली. यादरम्यान दलाचे उपसंचालक राजेंद्र हळदणकर तसेच विभागीय अधिकारी फ्रान्सिस मेंडीस यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

सदर कंपनी 2014 पासून मुंबईचे अश्फाक सय्यद हे चालवत आलेले आहेत. त्यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, मालाचे खोके (कार्टुन) बनविणाऱ्या या कंपनीचे काम दोन पाळ्यांमध्ये चालत होते. त्यात सर्वांत मोठे काम ‘आयएफबी’ कंपनीचे करण्यात येते. ‘आयएफबी’ला मालाचा पुरवठा करून कंपनीची गाडी शनिवारी पहाटे 3 वा. पोहोचली होती व चालक गाडी प्रकल्पाजवळ ठेऊन घरी गेला होता. त्यानंतर बाजूला असलेल्या अन्य एका कंपनीच्या सुरक्षा रक्षकाने आपल्या कंपनीच्या सुरक्षा रक्षकाला प्रकल्पातून धूर येत असल्याची माहिती दिली. त्यानंतर लगेच कुडचडे अग्निशामक दलाला कळविण्यात आले. सदर आगीत आतमधला सर्व माल जाळून खाक झाला आहे. हा माल अंदाजे सव्वादोन कोटी रुपयांहून जास्त किमतीचा होता, अशी माहिती अश्फाक सय्यद यांनी या प्रतिनिधीला दिली.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article