महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

गोवावेस येथील पेट्रोलपंपावर आगीची दुर्घटना

06:45 AM May 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

प्रतिनिधी/ बेळगाव

Advertisement

गोवावेस येथील दोड्डाण्णावर पेट्रोलपंपच्या केबिनला आग लागल्याची घटना शनिवारी दुपारच्या सुमारास घडली. केबिनमधील प्लास्टिक बॅनर व इतर साहित्याने पेट घेतल्याने आगीचा भडका उडाला. तात्काळ अग्निशमन विभागाच्या जवानांनी घटनास्थळी दाखल होत आग आटोक्यात आणली. परंतु, यामुळे गोवावेस परिसरात बघ्यांची गर्दी जमली होती.

Advertisement

मागील अनेक महिन्यांपासून बंद असलेल्या दो•ण्णावर पेट्रोलपंपाशेजारील केबिनला अचानक आग लागली. आजूबाजूला झाडांचा पालापाचोळा असल्याने आगीने रौद्ररूप धारण केले. पेट्रोलपंपाचे जुने बॅनर, तसेच इतर प्लास्टिक साहित्य यामुळे आग वाढत गेली. स्थानिकांनी जवळच असलेल्या अग्निशमन विभागाला संपर्क साधला. तात्काळ घटनास्थळी दाखल होत जवानांनी आग विझविली. यामध्ये केबिनमधील साहित्याचे नुकसान झाले. केबिनमध्ये वीजपुरवठा बंद असतानाही आग लागली कशी? याची पाहणी अग्निशमन अधिकाऱ्यांनी केली.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article