अजित पवार विमान अपघात प्रकरणी बेंगळुरात एफआयआर
आमदार रोहित पवार यांच्याकडून तकार दाखल : गंभीर आरोप
प्रतिनिधी/ बेंगळूर
महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील मृत्यूमागे कारस्थान होते, या आरोपावरून बेंगळूरमधील हायग्राऊंड पोलीस स्थानकात झिरो एफआयआर नोंदविण्यात आला आहे. अजित पवार यांचे पुतणे आणि महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी तक्रार दिल्यानंतर हा एफआयआर नोंदविण्यात आला आहे. त्यामुळे प्रकरणाला वेगळे वळण मिळण्याची शक्यता आहे.
तक्रारदार रोहित पवार यांनी महाराष्ट्रातील विविध पोलीस स्थानकांत तक्रार नोंदविण्याचा प्रयत्न केला. परंतु, एफआयआर नोंदविण्यास नकार देण्यात आला होता. त्यामुळे बेंगळूरमध्ये झिरो एआयआर नोंदविण्यात आला आहे. कार्यपद्धतीनुसार पुढील तपासासाठी हा एफआयआर बारामती ग्रामीण पोलिसांकडे वर्ग करण्यात आला असल्याची माहिती बेंगळुरातील एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिली आहे. 28 जानेवारी रोजी बारामती विमानळाजवळ बॉम्बर्डियर लियरजेट विमान कोसळून अजित पवार यांच्यासह इतर चौघांचा मृत्यू झाला होता.
रोहित पवार यांनी तक्रारीत विमानाच्या सुरक्षेबाबतच्या नियमांचे उल्लंघन, वैमानिकाचा इतिहास, ऐनवेळी केलेले बदल आणि अपघातापूर्वी घेतलेले संशयास्पद निर्णय या मुद्द्यांचा उल्लेख केला आहे. विमानाची स्थिती, पायलटची पार्श्वभूमी, ऑपरेशनल निर्णय यासह अनेक बाबींच्या आधारे सखोल चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
संबंधित विमानाने त्याच्या परवानगी असलेल्या कार्यकाळाची मर्यादा ओलांडली होती. सुरक्षिततेची मर्यादा 5 हजार उ•ाण तास असताना विमानाने जवळपास 8,000 तास पूर्ण केल्याचे वृत्त आहे. असे असूनही व्हीएसआर व्हेंचर्सने अधिकृत नोंदींमध्ये फेरफार करून त्याचा व्यावसायिक कामांसाठी वापर केला. डीजीसीएच्या तपासणीतही ते विमान उ•ाणासाठी योग्य नसल्याचे आढळून आले होते. वैमानिक सुमीत कपूरची पार्श्वभूमीही आक्षेपार्ह होती. असे असून देखील एका प्रतिष्ठित प्रवाशाला घेऊन जाणाऱ्या विमानाचे संचालन करण्याची जबाबदारी त्याच्यावर सोपविण्यात आली होती, असा उल्लेख रोहित पवार यांनी तक्रारीत केला आहे.
सुरुवातीला नेमलेले वैमानिक विमानो•ाणाच्या शेवटच्या क्षणी बदलण्यात आले. अचानक झालेला हा बदल संशयास्पद आहे. अजित पवार यांच्या रस्तेमार्गाने प्रवासाची योजना अचानक हवाई मार्गाने असा बदल का करण्यात आला, तो कोणी बदलला, याचा तपास करण्याची मागणीही रोहित पवार यांनी केली आहे.