खबरदारीच्या उपाययोजनेखाली अमननगरातील तरुणावर एफआयआर
12:29 PM Sep 30, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
बेळगाव : खबरदारीची उपाययोजना म्हणून अमननगर येथील एका तरुणावर माळमारुती पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक जे. एम. कालीमिर्ची यांनी ही कारवाई केली आहे. सकलेस मैनुद्दीन निंबरगी (वय 27) राहणार अमननगर असे त्याचे नाव आहे. या तरुणाच्या कारनाम्यामुळे अनेक कुटुंबांमध्ये भांडणे सुरू झाली आहेत. त्याच्यामुळे सार्वजनिक शांततेला धक्का पोहोचण्याची शक्यता गृहित धरून पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम 129(ई) व (जी) अन्वये एफआयआर दाखल केला आहे.
Advertisement
Advertisement