For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

हिंडलगा कारागृहासंबंधीचा व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांविरुद्ध एफआयआर

06:38 AM Aug 21, 2026 IST | Tarun Bharat Portal
हिंडलगा कारागृहासंबंधीचा व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांविरुद्ध एफआयआर
Advertisement

त. भा. प्रतिनिधी/ बेळगाव

Advertisement

हिंडलगा कारागृहासंबंधीचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्याविरुद्ध सायबर क्राईम विभागात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. यापूर्वी हिंडलगा येथे सेवा बजावलेल्या व सध्या बेंगळुरात असलेल्या एका महिला अधिकाऱ्याचा अर्धनग्न अवस्थेतील व्हिडिओ व्हायरल करण्यात आला आहे.

कारागृहाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बेंगळूर येथील इन्स्टाग्राम आयडी असणाऱ्या तरुणाबरोबरच तुमकूर येथील साईकुमार या दोघा जणांवर बुधवारी रात्री उशिरा एफआयआर दाखल करण्यात आला आहे. हिंडलगा मध्यवर्ती कारागृहाच्या फोटोचा वापर करीत एका महिला अधिकाऱ्याचा चेहरा ब्लर केलेला अर्धनग्न व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी कारागृहाच्या अधिकाऱ्यांनी केली आहे.

Advertisement

एका कैद्याशी व्हिडिओ कॉलवर बोलताना खाकी गणवेश काढणाऱ्या महिला अधिकाऱ्यासंबंधीचा तो व्हिडिओ आहे. बुधवार दि. 19 ऑगस्ट रोजी दुपारी इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ व्हायरल करण्यात आला आहे. त्यामुळे एकच खळबळ माजली असून व्हिडिओत एका कैद्याने संपूर्ण घटनेसंबंधी माहितीही दिली आहे. इन्स्टाग्रामवरील या व्हिडिओमुळे कारागृहातील कारभार चव्हाट्यावर आला आहे. कैद्याला अर्धनग्न अवस्थेत कॉल करणारी अधिकारी कोण? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. एका कैद्याने यासंबंधी लोकायुक्तांकडे तक्रार केल्याचेही संभाषणावरून स्पष्ट झाले आहे.

Advertisement
Tags :

.