For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दगडफेक प्रकरणी ?? जणांवर एफआयआर

06:55 AM Oct 05, 2025 IST | Tarun Bharat Portal
दगडफेक प्रकरणी    जणांवर एफआयआर
Advertisement

संदल ऊरुस मिरवणुकीवेळी खडक गल्लीत आगळीक, बंदोबस्तात वाढ; काही तरुणांना ताब्यात घेऊन पोलिसांकडून चौकशी सुरू

Advertisement

प्रतिनिधी/ बेळगाव

संदल मिरवणुकीवेळी शुक्रवारी रात्री उशिरा खडक गल्ली येथे झालेल्या दगडफेक प्रकरणी अकरा जणांविरुद्ध मार्केट पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी काही तरुणांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरू केली आहे. या घटनेनंतर देशभरात सुरू असलेल्या ‘आय लव्ह मोहम्मद’चे लोण बेळगावातही पोहोचल्याचे स्पष्ट झाले आहे. शुक्रवार दि. 3 ऑक्टोबर रोजी महाबूब सुबानी संदल ऊरुस मिरवणूक निघाली होती. ही मिरवणूक 10 वाजण्याच्या सुमारास खडक गल्लीत पोहोचली. पोलिसांनी ठरवून दिलेला मार्ग बदलून काही तरुण ‘आय लव्ह मोहम्मद’, ‘हमसे जो टकरायेगा, मिट्टी मे मिल जायेगा’ अशा घोषणा देत खडक गल्लीत घुसले. स्थानिक नागरिकांनी त्यांना अडवल्याने झालेल्या वादावादीनंतर घरांवर दगडफेक करण्यात आली आहे.

Advertisement

या प्रकरणी पप्पू पठाण, अश्फाक मोहम्मदशरीफ कलाल, मोहम्मद चोंचे, वासिम गवंडी यांच्यासह अकराहून अधिक जणांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. सुमारे 60 ते 70 जण खडक गल्लीत गेल्यामुळे ही घटना घडली आहे. पोलिसांनी त्यांना अडवूनही त्याचा उपयोग झाला नाही. घी गल्लीतून जाण्याऐवजी घोषणाबाजी करीत खडक गल्लीत गेल्याने ही घटना घडली आहे.

मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या बेळगाव दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी ही घटना गांभीर्याने घेतली होती. रात्री पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे, कायदा व सुव्यवस्था विभागाचे पोलीस उपायुक्त नारायण बरमणी, मार्केटचे एसीपी संतोष सत्यनायक, गुन्हे तपास विभागाचे एसीपी सदाशिव कट्टीमनी आदी अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. मार्केटचे पोलीस निरीक्षक महांतेश धामण्णावर व त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने हस्तक्षेप करीत तणाव निवळण्याचे प्रयत्न केले.दगडफेकीनंतर संवेदनशील भागात बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. खरेतर संदल मिरवणूक खडक गल्लीला पोहोचण्याआधीच हिंदू आणि मुस्लीम समाजाच्या प्रमुखांनी दरवर्षीप्रमाणे घी गल्लीतून मिरवणूक नेण्याचा सल्ला दिला. दोन्ही समाजाचे प्रमुख यासाठी समजावून सांगत असतानाच काही तरुणांनी केलेल्या आगळीकीमुळे ही घटना घडली आहे.

आता बेळगावातही संघर्षाला तोंड फुटले

उत्तरप्रदेशमध्ये सुरू झालेली ‘आय लव्ह मोहम्मद’च्या मोहिमेचे लोण आता बेळगावातही पोहोचले आहे. 4 सप्टेंबर रोजी कानपूरमध्ये ‘आय लव्ह मोहम्मद’ लिहिलेले फलक पोलिसांनी जप्त केले. त्यानंतर उत्तरप्रदेशसह गुजरात, कर्नाटकात फलक लिहिण्याचे सुरू झाले. तेलंगणा, उत्तराखंड, महाराष्ट्रमध्येही त्याचे लोण पोहोचले. त्याच्या बदल्यात समाजमाध्यमावर ‘आय लव्ह महादेव’चीही मोहीम सुरू झाली. दावणगेरीमध्ये तर अशा फलकांमुळे संघर्ष झाला होता. आता बेळगावातही संघर्षाला तोंड फुटले आहे.

Advertisement
Tags :

.