For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

नव्या फौजदारी कायद्यांतर्गत मोइत्रांवर एफआयआर

06:32 AM Jul 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
नव्या फौजदारी कायद्यांतर्गत मोइत्रांवर एफआयआर
Advertisement

राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षांवरील टिप्पणी भोवली

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष रेखा शर्मा यांना उद्देशून अत्यंत आक्षेपार्ह टिप्पणी करणे तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा यांना भोवले आहे. दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेच्या सायबर युनिटने मोइत्रा यांच्या विरोधात एफआयआर नोंदविला आहे. तृणमूल खासदारावर नव्या फौजदारी कायद्यांमधील कलम 79 अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला. महिला आयोगाने रेखा शर्मा यांना उद्देशून करण्यात आलेल्या टिप्पणी प्रकरणी शुक्रवारी तक्रार नोंदविली होती.

Advertisement

मोइत्रा यांच्याकडून सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर करण्यात आलेल्या पोस्टबद्दल राष्ट्रीय महिला आयोगाकडून तक्रार प्राप्त झाली होती. या तक्रारीची दखल घेत आणि प्रारंभिक चौकशीनंतर पीएस स्पेशलमध्ये कलम 79, बीएनएस-2023 अंर्तत गुन्हा नोंदविण्यात आल्याचे दिल्ली पोलिसांनी सांगितले आहे.

4 जुलै रोजी आयोगाच्या प्रमुख रेखा शर्मा यांनी उत्तरप्रदेशच्या हाथरस येथे झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेतील पीडितांची भेट घेतली होती. यावर मोइत्रा यांनी रेखा शर्मा या स्वत:च्या बॉसचा पायजमा पकडण्यात व्यग्र असल्याची आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. वाद उभा ठाकल्यावर महुआ यांनी एक्स पोस्ट डिलिट केली होती.

मोइत्रा यांच्याव एक्स पोस्टवर राष्ट्रीय महिला आयोगाने आक्षेप घेत दिल्ली पोलिसांकडे तक्रार नोंदविली होती. मोइत्रा यांनी केलेली टिप्पणी ही महिलांच्या प्रतिष्ठेला मलीन करणारी आहे. हा प्रकार भारतीय न्याय संहिता, 2023 चे कलम 79 अंतर्गत मोडतो. राष्ट्रीय महिला आयोग या कृत्याची कठोर निंदा करत असून त्वरित कारवाईची मागणी करत आहे. याप्रकरणी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना एक औपचारिक पत्र लिहिण्यात आले असल्याचे आयोगाकडून म्हटले गेले आहे.

स्वत:च्या टिप्पणीवर वाद झाल्यावर मोइत्रा यांनी दिल्ली पोलिसांना कारवाई करण्याचे आव्हान दिले होते. दिल्ली पोलिसांनी लवकर कारवाई करावी, मी नादिया (पश्चिम बंगाल) येथे आहे. गरज भासली तर तीन दिवसात अटक करा असे आव्हान मोइत्रा यांनी दिले होते.

Advertisement
Tags :

.