For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आठवडाभरात तब्बल पाऊण कोटींचा दंड वसूल

06:45 AM Aug 25, 2026 IST | Tarun Bharat Portal
आठवडाभरात तब्बल पाऊण कोटींचा दंड वसूल
Advertisement

उत्तर विभागातील पाच जिल्ह्यात वाहतूक नियम मोडणाऱ्यांवर कारवाई

Advertisement

त. भा. प्रतिनिधी/ बेळगाव

बेळगावसह उत्तर विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये वाहतूक नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करून केवळ आठवडाभरात पाऊण कोटी रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. उत्तर विभागाचे पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील यांनी ही माहिती दिली आहे.

Advertisement

बेळगाव, विजापूर, बागलकोट, धारवाड व गदग जिल्ह्यात दि. 17 ते 23 ऑगस्टपर्यंत आठवडाभरात एकूण 17 हजार 632 नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवर पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली आहे. त्यांच्याजवळून 78 लाख 58 हजार 150 रुपये इतका दंड वसूल करण्यात आला आहे.

गेल्या आठवडाभरात मोटार वाहन कायद्यांतर्गत उत्तर विभागात वाहतूक नियम मोडणाऱ्यांविरुद्ध कारवाईची विशेष मोहीम राबविण्यात आली. विनाहेल्मेट मोटारसायकल चालविणे, सीटबेल्टशिवाय कार चालवणारे, नशेत वाहने चालवणारे, ठराविक मर्यादेपेक्षा अधिक प्रवाशांची वाहतूक करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केली आहे.

संदीप पाटील हे बेळगाव उत्तर विभागाच्या पोलीस महानिरीक्षक पदावर रुजू झाल्यापासून पाचही जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था परिस्थिती अबाधित ठेवण्यासाठी पोलीस यंत्रणेला त्यांनी अधिक सतर्क केले आहे. खासकरून अमलीपदार्थांची वाहतूक करणारे, सेवन करणाऱ्यांबरोबरच वाहतूक नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे.

Advertisement
Tags :

.