बेकायदा डोंगर कापणीला आता एक कोटीपर्यंत दंड
पणजी : राज्यात बेकायदा डोंगरकापणी केल्यास आता एक कोटीपर्यंत दंड ठोठावला जाऊ शकतो, तसा निर्णय गोवा नगर आणि ग्राम नियोजन मंडळाने घेतला आहे. असे नगर नियोजनमंत्री विश्वजित राणे यांनी सांगितले. मंत्री राणे यांनी पत्रकारांना सांगितले की, पहिल्या गुह्यासाठी 50 लाख ऊपयांचा दंड आकारला जाईल, तर दुसऱ्या गुह्यासाठी 75 लाख ऊपये आणि तिसऱ्या गुह्यासाठी 1 कोटी ऊपयांपर्यंत वाढवला जाईल. उल्लंघन करणाऱ्यांवर पहिल्या गुह्यापासूनच नगर आणि ग्राम नियोजन कायद्यांतर्गत कारवाई केली जाईल. नगर नियोजन खात्याची भरारी पथके आधीच कारवाई करत आहेत. डोंगर कापणीच्या कोणत्याही घटनांची माहिती प्रशासनाला देण्याचे आवाहन सरकारने नागरिकांना केले आहे, असे ते म्हणाले. पर्यावरणाचा नाश करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे, असे ते म्हणाले. किनारपट्टीवरील राज्यातील पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील ठिकाणी संवर्धनाच्या उपाययोजनांची अंमलबजावणीबाबत खात्री करण्यासाठी, त्यांचा विभाग वेळोवेळी कोट्यावधी चौरस मीटर जमीन ‘विकासबंदी क्षेत्र’ म्हणून अधिसूचित करत आहे. असेही राणे यांनी सांगितले.