महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

कालप्रवासाच्या समीकरणाचा शोध ?

06:00 AM Mar 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

‘काल’ अर्थात इंग्रजीत ज्याला ‘टाईम’ म्हणतात हा मानवाच्या कुतुहलाचा विषय अतिशय पूर्वीपासून राहिलेला आहे. या विषयावर पुष्कळ संशोधन आजही होत असले तरी त्याचे गूढ नेमकेपणाने कधीच गवसत नाही. आपल्याला गतकाळात जाता येईल का, आणि त्याकाळचे जीवन प्रत्यक्षात अनुभवता येईल का ? यासंबंधात अनेकांना प्रचंड औत्सुक्य असते. या जिज्ञासेतूनच ‘कालयंत्र’ किंवा ‘टाईम मशिन’ या संकल्पनेचा जन्म झाला आहे. अनेक संशोधकांनी असे कालयंत्र निर्माण करुन भूतकाळात प्रवेशण्याचा असफल प्रयत्न अनेकदा केला आहे.

Advertisement

आजही या विषयावर संशोधन होत आहे. अमेरिकेतील रॉन मॅलेट हे या संशोधनात मग्न आहेत. त्यांनी नुकताच कालप्रवासाचे समीकरण शोधून काढल्याचे प्रतिपादन केले आहे. काल ही एकप्रकारची निर्वात पोकळी आहे, असे त्यांचे म्हणणे. हे समीकरण त्यांना ते रुग्णालयात असताना सुचले असे त्यांचे म्हणणे आहे. अवकाशात अनेक कृष्णविवरे आहेत. ती स्वत: भोवती फिरत असतात. त्यांच्या कार्यक्षेत्रात गुरुत्वाकर्षणाचे बल इतके असते की प्रकाशकिरणही त्यातून बाहेर पडू शकत नाहीत, असे संशोधकांचे म्हणणे आहे. अशा कृष्णविवरांच्या गुरुत्वाकर्षणात काळाचे तुकडे करण्याची क्षमता असते. काळाला मागे फिरविण्याचे त्यांचे सामर्थ्य आहे. त्यामुळे आपल्याला भूतकाळात जाणे शक्य होईल, असा त्यांचा विश्वास आहे. अर्थातच, अनेक इतर संशोधकांनी मॅलेट यांचे संशोधक केवळ कल्पनाविलास असल्याची टीका केली आहे. कारण ज्या पृथ्वीवर आपण रहातो, तेथे कृष्णविवर निर्माण करता येणे शक्य नाही. तसेच विश्वात जेथे कृष्णविवर आहे तेथवर आपल्याला जाणे शक्य नाही. गेले तरी तेथे संशोधन करण्यासाठी जिवंत राहणे शक्य नाही. त्यामुळे मॅलेट यांच्या संशोधनाचे व्यवहारी मूल्य शून्य आहे, असे ते स्पष्ट करतात. पण मॅलेट यांनी धीर सोडलेला नाही.  एक दिवस आपल्या संशोधनाचे महत्व जगाला पटेल, असा विश्वास त्यांना आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article