कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

Miraj Civil Hospital : रुग्णालयातून मूल पळविणाऱ्या महिलेची कबूली; म्हणाली, माझं बाळ....

12:10 PM May 06, 2025 IST | Snehal Patil
Advertisement

रुग्णालयातील चोरी झालेले ते बाळ सुखरुप, आरोपी महिलेची पोलिसांसमोर कबुली

Advertisement

मिरज : येथील शासकीय रुग्णालयात सुरक्षेचे कडे तोडून तीन दिवसाच्या नवजात अर्भकाचे अपहरण करणाऱ्या महिलेला 48 तासांच्या अथक प्रयत्नानंतर तासगांव तालुक्यातील सावळज येथून अखेर गजाआड करण्यात आले. बाळ सुस्थितीत असून मुळ आईकडे सुपूर्द करण्यात आले आहे. बाळाला पळवून नेणारी संशयीत महिला सायरा सायबा साठे हिला अटक करण्यात आली आहे.

Advertisement

महात्मा गांधी चौकी पोलीस, स्थानिक गुन्हा अन्वेषण आणि तासगांव पोलिसांच्या तपास कार्यामुळे चिमुकले बाळ आपल्या आईच्या कुशीत सुखरुप परतले आहे. संशयीत सायरा हिचे एक मुल सहा महिन्यांपूर्वी कोणत्या तरी आजाराने दगावले होते. या मुलाचा विरह सहन होत नसल्याने तिने दुसऱ्याचे मुल चोरुन नेल्याचे पोलिसांना सांिगतले.

कविता समाधान अलदर (रा. कोळे, ता. सांगोला) या महिलेने बाळाला जन्म दिलेला होता. त्यानंतर संबंधीत महिलेवर उपचार सुरू होते. संशयीत सायरा साठे हिने संबंधीत महिला रुग्ण व तिच्या नातेवाईकांशी ओळख वाढवून जवळीक केली. शनिवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास बाळाला डोस पाजवण्यासाठी बोलविले असल्याचे सांगून वैद्यकीय कागदत्रांसह बाळाला 16 नंबर वार्डात नेले.

सोनोग्राफी करण्याचे कारण सांगून सदर महिलेने बाळाला रुग्णालयातून पळवून नेले होते. या घटनेने खळबळ उडाली होती. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर संशयीत महिला एका प्लॅस्टीकच्या कॅिरबॅगमधून अर्भक नेत असल्याचे चित्रिकरण झाले होते. ज्या ऑटो रिक्षातून ही महिला पसार झाली, त्या रिक्षाचा क्रमांकही सीसीटीव्हीत कैद झाला होता. गांधी चौकी पोलिस आणि स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पोलिस पथकाकडून कौशल्याने तपास करत काही ठिकाणी छापेमारी करण्यात आली.

गेल्या 48 तासांपासून महिलेचा माग काढला जात होता. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, बाळ चोरणारी संशयित महिला तासगांव तालुक्यातील सावळज येथील असल्याचे समजले. त्यानंतर तासगांव पोलिसांनी कौशल्यपूर्ण माहिती घेऊन महिलेचा ठावठिकाणा शोधून काढला. सोमवारी सायंकाळी पोलिसांच्या पथकाने संबंधीत महिलेच्या घरावर छापा टाकून बाळाला सुखरुप ताब्यात घेतले. सायरा साठे हिलाही अटक करण्यात आली.

माझं बाळ....

पोलिसांनी तपास करताना बाळाच्या आईसह तिच्या आजी-आजोबांनाही विश्वासात घेतले होते. तासगांव तालुक्यातील सावळज गावात बाळ सापडले. ही पहिली बातमी तिच्या आईला देण्यात आली. बाळ सुखरुप सापडल्याचा आनंद आईच्या चेहऱ्यावर मावत नव्हता. बाळाला भेटण्याची ओढ लागली होती.

पोलिसांनी सावळजमधून थेट शासकीय रुग्णालयात गाडी वळवली. आधी आईच्या उबदार कुशीत बाळाला सुपूर्द केले. बाळाला हातात घेताच आईने ‘माझं बाळ’ असे म्हणून जोरात हुंदका दिला. आनंदाश्रू वाहून दुखा:ची वाट मोकळी केली. बाळाचा मुका घेऊन मिठी मारली. पोलिसांचेही आभार मानले.

संदीप गुरव ठरले आयडॉल

बाळ चोरीची ही घटना मिरजेसाठी दुर्मिळच. केवळ सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर पोलिस महिलेचा माग काढत होते. प्रसंगी कर्नाटक, कोल्हापूरसह आसपासच्या गावात छापेमारी सुरू होती. काही धागेदोरे हाती लागल्याने संबंधीत महिला तासगांव तालुक्यातील असल्याचे निष्पन्न झाले. तासगांवचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप गुरव यांनी दिवसभर कौशल्याने तपास करुन अखेर सावळज गावात बाळ चोरणाऱ्या महिलेला शोधून काढले.

बाळ सापडले, दोषी सोडू नका

पोलिसांच्या कौशल्यपूर्ण तपासामुळे 48 तासात बाळ सुखरुप सापडले, ही आनंदाची बाब असली तरी शासकीय रुग्णालयाच्या ढिसाळ सुरक्षा यंत्रणेमुळे बाळ चोरीला गेले होते, हे नाकारुन चालणार नाही. शासकीय रुग्णालयाच्या अध्यापक अधिकारी समितीकडून या प्रकरणाची चौकशी सुरूच आहे. आज त्याचा अहवाल येणार आहे. या अहवालात ज्या-ज्या दोषींची नांवे असतील त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी जोर धरत आहे.

स्वत:चे मेले म्हणून दुसऱ्याचे पळविले

संशयीत सायरा साठे हिला सहा महिन्यांपूर्वी एक बाळ होते. कोणत्या तरी आजाराने सदर बाळाचा मृत्यू झाला होता. सायरा हिला बाळाचा विरह सहन होत नव्हता. तिला बाळ हवेच असल्याने शासकीय रुग्णालयात तिने रेकी सुरू केली. कोणी तरी बेवारसाचे बाळ आपल्याला मिळेल, अशी समजूत होती. मात्र, तिने कविता अलदार यांच्या बाळाला लक्ष केले. अलदर यांच्याशी जवळीक वाढवून बाळाला शांत डोक्याने पळवून नेले, असे पोलिस तपासातून समोर आले आहे. स्वत:चे मुल मेले होते म्हणूनच दुसऱ्याचे पळविले अशी कबुलीही तिने पोलिसांना दिली आहे.

Advertisement
Tags :
_police_action#miraj#miraj_hospital_news#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMediapolice investigationsangli news
Next Article