प्रेम शोधा, जोडीदार मिळवा
जपानच्या सरकारने घटत्या लोकसंख्येला सामोरे जाण्यासाठी अनोखे पाऊल उचलले आहे. युवांना डेटिंग अॅपचा वापर करण्यासाठी प्रोत्साहित केले जातेय. याच्या अंतर्गत सरकार आर्थिक सहाय्य देत आहे, जेणेकरून अधिकाधिक लोक या प्लॅटफॉर्म्सवर जोडले जातील आणि नाते निर्माण करू शकतील. याचा उद्देश युवांना विवाह आणि परिवाराच्या दिशेने प्रेरित करणे आहे.
जपानच्या कोची प्रांताने ‘मीटिंग सपोर्ट प्रोजेक्ट ग्रँट’ सुरू केला आहे. या योजनेचा उद्देश अविवाहित युवांना डेटिंग अॅप्सद्वारे जोडणे आहे. युवांनी या प्लॅटफॉर्म्सचा वापर करत परस्परांना जाणून घ्यावे आणि पुढे जात विवाह करावा अशी सरकारची इच्छा आहे. हा पुढाकार सामजिक जोडलेपण वाढविण्याच्या दिशेने उचलण्यात आलेले पाऊल आहे.
जपानमध्ये नातेसंबंधांवरून लोकांमध्ये उदासीनता वाढत आहे. यामागे वाढती महागाई, बदलती जीवनशैली आणि करियरवर वाढता फोकस मोठे कारण मानले जात आहे. अनेक युवा आर्थिक अस्थिरतेमुळे विवाह आणि मुलांना जन्म देणे टाळत आहेत. याचबरोबर बदलत्या सामाजिक दृष्टीकोनाने देखील या वृत्तीला आणखी मजबूत केले आहे.
या योजनेच्या अंतर्गत पात्र अविवाहि युवांना दरवर्षी 20000 येनपर्यंतचे अनुदान दिले जाईल. ही रक्कम डेटिंग अॅप्सवर नोंदणी आणि सब्सक्रिप्शनवर खर्चासाठी दिली जात आहे. यामुळे युवांसाठी या प्लॅटफॉर्म्सचा वापर करणे सोपे ठरेल आणि ते नात्यांच्या दिशेने पाऊल टाकू शकतील असे सरकारचे मानणे आहे.
ही योजना 20-39 वयोगटातील अविवाहित युवांसाठी लागू करण्यात आली आहे. या वयोगटातील लोकांनी सक्रीय स्वरुपात डेटिंग अॅप्सचा वापर करावा अशी सरकारची इच्छा आहे. योजना 1 एप्रिलपासून लागू करण्यात आली असून याचा उद्देश युवांना विवाहासाठी प्रोत्साहित करणे आहे. यामुळे लोकसंख्या वाढविण्याच्या दिशेने मदत मिळण्याची अपेक्षा आहे.
सरकार केवळ ऑनलाइन प्लॅटफॉर्म्सपुरते मर्यादित नाही. ज्या संस्था ऑफलाइन पद्धतीने लोकांना मिळविण्याची काम करतात, त्यांनाही आर्थिक मदत दिली जात आहे. अशा आयोजनांमुळे युवांना आमने-सामने येण्याची संधी मिळले. यामुळे नाते मजबूत करणे आणि विवाहापर्यंत पोहोचण्याची शक्यता वाढणार आहे.
जपानमध्ये लोकसंख्या सातत्याने घटत आहे. 2025 मध्ये जन्म घेणाऱ्या मुलांची संख्या 7 लाखाच्या आसपास राहिली. हे प्रमाण अनेक दशकांमध्ये सर्वात कमी आहे. ही सातत्याने होणारी घसरण सरकारसाठी चिंतेचे कारण ठरली आहे. यामुळे आता अशाप्रकारचे नवे प्रयोग केले जात आहेत, ज्यामुळे युवांना विवाह आण परिवाराच्या दिशेने आकर्षित केले जाऊ शकेल.
जपान जगातील सर्वात वेगाने वृद्ध होणाऱ्या देशांमध्ये सामील आहे. 2024 मध्ये जपानमध्ये 65 वर्षे किंवा त्याहून अधिक वय असलेल्या लोकांची संख्या 36 दशलक्षापेक्षा अधिक झाली होती. एकूण लोकसंख्येत त्यांचा हिस्सा जवळपास 29 टक्के आहे. युवा लोकसंख्या घटणे आणि वृद्ध वाढल्याने आर्थिक आणि सामाजिक संतुलनावर प्रभाव पडत आहे.