For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आर्थिक, फार्मा-वाहन समभाग सकारात्मक एफएमसीजीवर सावध भूमिका

06:42 AM May 15, 2024 IST | Tarun Bharat Portal
आर्थिक  फार्मा वाहन समभाग सकारात्मक  एफएमसीजीवर सावध भूमिका
Advertisement

इन्व्हेटेक कॅपिटल सर्व्हिसेस इक्विटीज प्रमुखांचे मत

Advertisement

वृत्तसंस्था/ मुंबई

फेड मीटिंग आणि लोकसभा निवडणुकीच्या निकालांसारख्या मोठ्या कार्यक्रमांपूर्वी शेअर बाजार स्वत:ला समर्थन पातळीवर टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. या काळात, गुंतवणूकदार चांगले मूल्यांकन असलेल्या क्षेत्रांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी स्टॉक शोधत आहेत.

Advertisement

स्टॉक सिलेक्शनमध्ये कोणत्या क्षेत्रात गुंतवणूक करायची हे निवडणे महत्त्वाचे आहे. आगामी काळात नवीन सरकार स्थापन झाल्यावर कोणत्या गुंतवणुकीची थीम सर्वाधिक परतावा देऊ शकते यावर प्रकाश टाकण्यात आलाय. तज्ञांच्या यादीत फार्मा, पीएसयू, बँकिंग, ऑटो, मेटल, एफएमसीजी या क्षेत्रांचा समावेश आहे. ज्यात गुंतवणूक केली जाऊ शकते.

इन्व्हेटेक कॅपिटल सर्व्हिसेसचे इन्स्टिट्यूशनल इक्विटीजचे प्रमुख मुकुल कोचर यांनी या संदर्भात संकेत व्यक्त केले आहेत.

पुढे ते म्हणाले, की बाजारासाठी निवडणुकीच्या निकालात काहीही नकारात्मक होण्याची शक्यता फार कमी असली तरी निवडणुकांबाबत बातम्यांचा प्रवाह इतका जास्त आहे की बाजारात अस्थिरता वाढत आहे. यामुळे गुंतवणुकीसाठी क्षेत्र निवडताना सावधगिरी बाळगणे आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

एफएमसीजी कंपन्यांमध्ये गुंतवणूकीवेळी मात्र सावधगिरी बाळगायला हवी.

Advertisement
Tags :

.