महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

गॅरंटी योजनांमुळे गोर-गरिबांना आर्थिक पाठबळ

11:16 AM Apr 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

उमेदवार मृणाल हेब्बाळकर, शहरात विविध भागात प्रचार

Advertisement

बेळगाव : राज्य सरकारकडून जारी करण्यात आलेल्या पाच गॅरंटी योजना नागरिकांसाठी वरदान ठरल्या आहेत. दुष्काळ परिस्थितीमुळे संकटात सापडलेल्या नागरिकांना या योजनांमुळे मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे गोर-गरिबांच्या कल्याणासाठी विकासाभिमुख योजना राबविणाऱ्या काँग्रेसला मतदान करून पाठिंबा द्यावा, असे आवाहन बेळगाव लोकसभा उमेदवार मृणाल हेब्बाळकर यांनी केले. शहरातील उत्तर विधानसभा मतदार संघात येणाऱ्या शिवाजी रोड, मुजावर गल्ली, पाटीलमळा, ताशिलदार गल्ली, फुलबाग गल्ली, मठ गल्ली, भातकांडे गल्ली आदी भागात मृणाल हेब्बाळकर यांनी प्रचार केला. या दरम्यान मतदारांशी बोलताना सरकारच्या योजनांची माहिती त्यांनी दिली. यावेळी मतदारांकडून सरकारच्या पाच गॅरंटी योजनांबद्दल आनंद व्यक्त केला. सरकारच्या योजनांमुळे आर्थिक पाठबळ मिळाले असल्याचे अनेक गृहिणींकडून सांगण्यात येत आहे. शक्ती योजनेमुळे कामावर जाणाऱ्या महिलांना अधिक दिलासा मिळाला आहे. तर गृहलक्ष्मीमुळेही आर्थिकरित्या  पाठबळ मिळाल्याचे मत व्यक्त करण्यात आले. यावेळी मतदारांनी त्यांचे जंगी स्वागत करून विकास कामे राबविण्याची मागणी केली.

Advertisement

विकासकामे राबविण्याचे आश्वासन

यावेळी मृणाल हेब्बाळकर यांनी विकास कामे राबविण्यास नेहमीच प्राधान्य देवू, मतदार संघातील समस्यांचे निवारण करण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न केले जातील, असे सांगून या निवडणुकीत बहुमताने निवडून देण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी गल्लीतील नेते, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article