श्री विसर्जन मिरवणुकीत दगावलेल्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदतीचा हात
विविध गणेशोत्सव मंडळांकडून सहकार्य
बेळगाव : मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाच्यावतीने मागील वर्षी झालेल्या विसर्जन मिरवणुकीत दगावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्यात आली. मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर यांच्या नेतृत्वाखाली मंडळांना आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत शहरातील मंडळांनी आर्थिक मदत महामंडळाकडे जमा केली होती.
रविवारी ही सर्व आर्थिक मदत एकत्रित करून मयत क्यक्तींच्या कुटुंबीयांना देण्यात आली. आर्थिक मदत देतेवेळी महामंडळाचे पदाधिकारी चंद्रकांत कोंडुसकर, सचिव आनंद आपटेकर, दसरा महामंडळाचे सचिव विजय तमूचे, चव्हाट गल्ली येथील गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष श्रीनाथ पवार, बळवंत शिंदोळकर, कुंज नावगेकर, विनायक पवार, प्रथमेश मोहिते यांच्यासह इतर उपस्थित होते.
विसर्जन मिरवणुकीवेळी दगावलेले कै. सदानंद चव्हाण-पाटील यांच्या पत्नी रुपा चव्हाण-पाटील व कै. विजय राजगोळकर, रा. तेग्गीन गल्ली, वडगाव यांच्या कुटुंबीयांना रक्कम पोहोचविण्यात आली. शिवाजी रोड, कोनवाळ गल्ली, खडेबाजार, ताशिलदार गल्ली, नेहरूनगर, महाद्वार रोड, हंस टॉकीज रोड, रामलिंगवाडी शहापूर, अष्टविनायकनगर-वडगाव, कोनवाळ गल्ली या मंडळांनी आर्थिक मदत जमा केली होती.