For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

इन्सुलीत घर बेचिराख झालेल्या नेवगी कुटुंबीयाना आर्थिक मदत

12:54 PM Jan 11, 2024 IST | अनुजा कुडतरकर
इन्सुलीत घर बेचिराख झालेल्या नेवगी कुटुंबीयाना आर्थिक मदत
Advertisement

अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक सामाजिक संघाची बांधिलकी

Advertisement

ओटवणे | प्रतिनिधी
फक्त हक्कांसाठी न लढता कर्तव्य व जबाबदारीची जाणीव ठेवणाऱ्या अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाने इन्सुली येथे आगीत घर बेचिराख झालेल्या नेवगी कुटुंबाला रोख १४ हजार रुपयाची मदत व मुलीला शैक्षणिक साहित्य देऊन सामाजिक बांधिलकी जोपासली. संकट काळात धावून आलेल्या अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघामुळे नेवगी कुटुंबीयांना थोडासा दिलासा मिळाला असुन त्यांनी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे आभार मानले.

चार दिवसांपूर्वी इन्सुली सावंत टेंब येथील कु. दृष्टी नेवगी या दुसरीत शिकणाऱ्या शालेय विद्यार्थीनीचे शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत संपूर्ण घर बेचिराख झाले. घरातील सर्व वस्तू या आगीत भस्मसात झाल्यामुळे या कुटुंबाची प्रचंड हानी झाली. त्यामुळे या कुटुंबाला आधार देण्यासाठी व त्यांना संसारोपयोगी आवश्यक साहित्य घेण्यासाठी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या सावंतवाडी तालुक्यातील शिक्षक सदस्यांनी पुढाकार घेतला. त्यांच्या दातृत्वतून जमा झालेले रोख १४ हजार रूपये आणि मुलीला गणवेश व शैक्षणिक साहित्याचे वितरण नेवगी कुटुंबीयांना करण्यात आले.यावेळी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघटनेचे राज्य संयुक्त चिटणीस म. ल देसाई, तालुकाध्यक्ष संजय शेडगे, सचिव अमोल पाटील, पतपेढीचे संचालक सुभाष सावंत, महिला अध्यक्षा वंदना सावंत, महिला सचिव तेजस्विता वेंगुर्लेकर, गुरुनाथ राऊळ, नेहा सावंत, मृगाली पालव, केंद्रप्रमुख नरेंद्र सावंत, मनोहर गवस, मुख्याध्यापिका सुषमा गावडे आदीसह संघटनेचे जिल्हा व तालुका प्रतिनिधी उपस्थित होते.विद्यार्थी विकासासाठी नेहमीच तत्पर असणाऱ्या व सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या सावंतवाडी शाखेच्याच्यावतीने २०१९, आणि २०२१ च्या महापुराच्या वेळी पूरग्रस्तांना अनुक्रमे अडीच लाख आणि दीड लाख रूपयांच्या जीवनावश्यक साहित्याचे वितरण केले होते. तसेच दरवर्षी गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत, रक्तदान शिबिरे, नेत्रतपासणी शिबिर, चष्मेवाटप शिबीर, मास्क व अर्सेनिक अल्बम गोळ्या वाटप, महिला सक्षमीकरण असे विविध सामाजिक उपक्रम आयोजित करते. समाजाच्या ऋणातून उतराई होण्यासाठी नेहमीच अग्रेसर असलेल्या शिक्षक संघाने आपल्या सर्व शिक्षकांच्या सहकार्यातून घेतलेली सुसज्ज रुग्णवाहिका गेल्या २ वर्षांपासून समाजाच्या सेवेत आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.