महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

सामाजिक बांधिलकी बनली निराधारांचा आधार

03:02 PM Oct 13, 2024 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

अपंग आणि निराधारांना केली आर्थिक मदत

Advertisement

सावंतवाडी । प्रतिनिधी

Advertisement

सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान व काळसे पंचक्रोशी अपंग सेवा संस्थेकडून शिंदे व दिव्यांग डिमेलो भगिनींना आर्थिक मदत देण्यात आली. शिंदे भगिनींना रोख ५ हजार आणि राशन तर डिमेलो भगिनींना रोख ३ हजारांची मदत करण्यात आली . यावेळी सामाजिक बांधिलकीचे अध्यक्ष सतीश बागवे, उपाध्यक्ष शैलेश नाईक ,सचिव समीरा खलील ,कार्याध्यक्ष संजय पेडणेकर ,काळसे पंचक्रोशी सेवा संस्थेचे अध्यक्ष विनोद धुरी ,रूपा मुद्राळे ,अशोक पेडणेकर , शरदीनी बागवे, प्रसाद कोदे ,सुजय सावंत, हेलन निबरे , शरद पेडणेकर, शेखर सुभेदार व शाम हळदणकर यांनी देखील सहकार्य केले. जिल्ह्यात नुकताच नवरात्र उत्सव पार पडला . यावेळी देवीकडे जमलेले टिकाऊ अन्नपदार्थ सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानकडे जमा केल्यास आम्ही गरजू व निराधार व्यक्तींपर्यंत ते पदार्थ पोहोचवू शकू यासाठी जिल्ह्यातील मंडळींनी पुढाकार घेऊन सामाजिक बांधिलकी जवळ अन्नधान्य जमा करा करावे असे आवाहन सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव यांनी केले आहे.

Advertisement
Tags :
# tarun bharat news # news update # konkan update # sawantwadi
Next Article