साटेली - भेडशीच्या संकटग्रस्त भगिनाला प्राथमिक शिक्षकांकडून आर्थिक मदत
गॅस सिलेंडर स्फोटात घराचे झाले होते मोठे नुकसान
(साटेली भेडशी प्रतिनिधी)
मंगळवार दि.8 एप्रिल ला साटेली भेडशी येथील अंकिता अर्जून नाईक यांच्या घरी गॅस सिलेंडर चा स्फोट झाला. या भयानक स्फोटात नाईक कुटूंबाच फार मोठ नुकसान झालं. नविन घराच स्वप्न साकारायला निघालेल्या या सामान्य परिवाराचे क्षणार्धात होत्याचे नव्हत झाले.या कठीण प्रसंगात श्रीम. नाईक व त्याच्या मुलाला आधार देण्यासाठी प्राथमिक शिक्षकांनी आर्थिक मदत केली. कै. सखाराम झोरे यांच्या सामाजिक कार्याची आठवण जपत त्यांच्या मित्र परिवाराने ही आर्थिक मदत करायची ठरवली आणि तात्काळ ही मदत सरपंच सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष प्रविण गवस, साटेली भेडशीच्या सरपंच छाया धर्णे, ग्रामपंचायत सदस्य व तरुण पत्रकार गणपत डांगी, अमित सडेकर, बोडदे ग्रामस्थ संदिप लक्ष्मण नाईक व इतर मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत प्राथमिक शिक्षक पतपेढी संचालक दयानंद नाईक व राकेश कर्पे व सहकारी शिक्षक मित्रांच्या हस्ते नाईक कुटूंबाला मदत देण्यात आली.
शिक्षकांनी ज्ञानदानाच्या प्रवित्र कार्याबरोबरच सामाजिक कार्याची परंपरा पार पाडली याबद्दल प्रविण गवस,सरपंच छाया धर्णे यांनी कौतुक करीत शिक्षक वृंद दात्यांचे आभार मानले. आमच्या सहकारी शिक्षक कै. सखाराम झोरेंचे सामाजिक काम आम्ही असेच पुढे चालू ठेवू असे आश्वासन या शिक्षक मित्रांचे प्रमुख अरुण पवार , रवि देसाई, जनार्दन पाटील,मणिपाल राऊळ,प्राची गवस पूजा जयेंद्र बिर्जे आणि महेश नाईक दिले.