कलंबिस्त येथे शिवरायांचा पुतळा उभारण्यासाठी मंत्री केसरकरांकडून आर्थिक मदत
सावंतवाडी प्रतिनिधी
कलंबिस्त गणशेळवाडी येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य दिव्य असा पुतळा उभारण्यासाठी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आर्थिक मदत देण्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे सह्याद्री पट्ट्याच्या भागात सैनिकी परंपरा असलेल्या गावात महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळारुपी स्मारक उभे राहण्यास चालना मिळाली आहे. या भागात छोटा पुतळा उभारण्यात आला आहे. मात्र त्या ठिकाणी भव्य दिव्य पुतळा उभारण्याच्या दृष्टीने या भागातील तरुण एकत्र आले आहेत.यावेळी गावातील व या वाडीतील तरुणांच्या शिष्टमंडळाने श्री केसरकर यांच्या संपर्क कार्यालयात शिवसेनेचे तालुकाप्रमुख नारायण राणे यांना निवेदन दिले यावेळी शिवसेनेचे पंचायत समिती विभाग प्रमुख संजय पालकर ,चेतन सावंत ,निखिल सावंत ,अनिल उर्फ गोठ्या. सावंत , सोमकांत सावंत,कुसाची सावंत., गोपाळ सावंत. ,संतोष सावंत ,.रवींद्र तावडे ,.निलेश सावंत ,बाबुराव तावडे ,.रवी कमल सावंत,सचिन सावंत, सगुण सावंत, शैलेश सावंत ,रवी सावंत ,प्रवीण सावंत ,महेश सावंत, अक्षय सावंत, आधी उपस्थित होते.