महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

मध्यवर्ती गणेशोत्सव महामंडळाकडून आर्थिक मदत

10:53 AM Sep 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

50 हजार रुपयांची रक्कम जखमीच्या कुटुंबीयांना सुपूर्द

Advertisement

बेळगाव : गणेश विसर्जन मिरवणुकीवेळी पाटील गल्ली, शनिमंदिर येथे दुर्घटनेत विजय राजगोळकर ही व्यक्ती जखमी झाली होती. त्यांना सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले होते. परंतु तिथे शस्त्रक्रिया करण्यासाठी काही तांत्रिक अडचणी आल्यामुळे विजय हॉस्पिटल येथे त्यांना दाखल करण्यात आले. त्यांच्या उपचारासाठी मध्यवर्ती गणेशोत्सव महामंडळाकडे विविध मंडळांनी मदत जमा केली होती. ती सर्व रक्कम बुधवारी एकत्र करून 50 हजार रोख जखमी व्यक्तीच्या नातेवाईकांकडे देण्यात आली. मध्यवर्ती गणेश उत्सव महामंडळ बेळगावचे अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर यांच्याकडून 5,000 रुपये, चव्हाट गल्ली गणेशोत्सव मंडळाकडून 11,000 रुपये, ताशिलदार गल्ली गणेशोत्सव मंडळाकडून 5000 रुपये, जत्तीमठ देवस्थानकडून 10,000 रुपये, शाहूनगर गणेशोत्सव मंडळातर्फे 10,000 रुपये, खादरवाडी गणेशोत्सव मंडळातर्फे 5,652 रु., अभिजीत भातकांडे, पाटील गल्ली यांच्याकडून 5000 रु. अशी एकूण 51652 ऊपये रक्कम जमा झाली होती. त्यातील 50 हजार रुपये विजय राजगोळकर यांच्या कुटुंबीयांना देण्यात आले. अद्याप काही मंडळांनी देणगी जाहीर केली असून त्यांची रक्कम जमा केली जात आहे. ही रक्कम सदानंद चव्हाण-पाटील यांच्या कुटुंबीयांना दिली जाणार आहे. यावेळी महामंडळाचे अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर,सचिव आनंद आपटेकर यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article