महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

हुपरीतील दिवंगत धारकऱ्याच्या कुटुंबाला बेळगाव शिवप्रतिष्ठानकडून आर्थिक मदत

11:26 AM Jul 23, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेळगाव : शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान बेळगावच्यावतीने गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून शिवप्रतिष्ठानचे हुपरी येथील धारकऱ्याच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्यात आली. कै. सागर वाईंगडे यांचा मोहिमेत अपघाती मृत्यू झाला होता. त्या कुटुंबाला बेळगावमधील धारकऱ्यांच्यावतीने एक लाख रुपयांची मदत देण्यात आली. गुरुपौर्णिमेनिमित्त भिडे गुरुजींचे दर्शन व पाद्यपूजा करून गुरुजींच्या आदेशानुसार वाईंगडे कुटुंबीयांना आर्थिक मदत देऊ करण्यात आली. यावेळी कर्नाटक प्रांतप्रमुख किरण गावडे, जिल्हाप्रमुख विश्वनाथ पाटील, तालुका कार्यवाहक कल्लाप्पा पाटील, विभागप्रमुख किरण बडवाण्णाचे, गजानन पाटील, संदेश बाणेकर, हुपरी शहरप्रमुख अजित सुतार, मांगूर विभागप्रमुख महावीर चौगुले यासह इतर उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article