सुधीर आडिवरेकरांकडून सावंतवाडी नंबर 6 शाळेस आर्थिक मदत
सावंतवाडी । प्रतिनिधी
सावंतवाडी येथील शाळा नंबर 6 या शाळेला आपण सर्वतोपरी सहकार्य करणार आहे. या शाळेच्या शैक्षणिक विकासासाठी आपल्याकडून मदत केली जाईल असे सामाजिक कार्यकर्ते राजू भालेकर व माजी नगरपालिका आरोग्य सभापती सुधीर आडिवरेकर यांनी स्पष्ट केले. यावेळी शाळेला सात हजार रुपयाची आर्थिक मदत श्री आडिवरेकर यांनी केली. सावंतवाडी येथील शाळा नं 6 चे वार्षिक स्नेहसंमेलन व बक्षिस वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता यावेळी. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रसिद्ध भालेकर भोजनालयाचे मालक राजू भालेकर , प्रमुख अतिथी केंद्रप्रमुख कमलाकर ठाकूर ,.सुमेधा धुरी ,माजी नगरपालिका आरोग्य सभापती सुधीर आडिवरेकर, माजी नगरसेविका दिपाली भालेकर,.दिलीप भालेकर श्री. पवार ,श्रीम.मुननकर ,ॲड.संजू शिरोडकर,वैभवी शेवडे . श्रीम. खोचरे , श्रीम तुयेकर आदी उपस्थित होते. प्रथम कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री राजू भालेकर यांच्या हस्ते सरस्वती मातेच्या प्रतिमेला पुष्पहार घालून व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते इनरव्हील क्लब तर्फे घेण्यात आलेल्या स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षिस वितरण करण्यात आले . यावेळी सर्व मान्यवरांचे शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानावरून बोलताना . राजू भालेकर यांनी सर्वांना शुभेच्छा देताना शाळेच्या भौतिक गरजा पूर्ण करण्यासाठी भरीव प्रयत्न करीन असे आश्वासन दिले व शाळेच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तर दिलीप भालेकर , सुधीर आडिवरेकर यांचा शुभेच्छा संदेश वाचून दाखविला. नंतर शाळेच्या शिक्षिका श्रीम. सायली लांबर आणि श्रीम.मेघा गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली मुलांनी विविध कलाविष्कार सादर करून प्रेक्षकांची वाहवा मिळविली.संध्याकाळी रघुकुल स्वरविहार सावंतवाडी प्रस्तुत सुमधुर भावगीतांवर आधारित स्वरसांज हा कार्यक्रम माननीय ईश्वरी तेजम मॅडम आणि सहकाऱ्यांनी सादर केलाकार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा खोचरे मॅडम, उपाध्यक्षा तुयेकर ,दिलीप भालेकर ,माता पालक संघाच्या उपाध्यक्षा श्रीम. शेख ,शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष श्री. तेजम ,श्रीम.तेजम ,राजू भिसे, पालक वर्ग, मुख्याध्यापक , केशव जाधव , शिक्षिका श्रीम.सायली लांबर,श्रीम.मेघा गावडे यांनी प्रयत्न केले.