For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अर्थमंत्री सीतारामन कतार दौऱ्यावर

06:10 AM Sep 29, 2026 IST | Tarun Bharat Portal
अर्थमंत्री सीतारामन कतार दौऱ्यावर
Advertisement

एआयआयबी’च्या बैठकीला उपस्थित राहणार

Advertisement

वृत्तसंस्था/ दोहा

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँकेच्या (एआयआयबी) 11 व्या वार्षिक बैठकीत आणि एआयआयबी गुंतवणूकदार संवाद 2026 मध्ये सहभागी होण्यासाठी कतारची राजधानी दोहा येथे पोहोचल्या आहेत. कतारमधील भारताचे राजदूत श्रीकर रेड्डी कोप्पूला यांनी दोहा येथील हमाद आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्यांचे औपचारिक स्वागत केले. अर्थमंत्री ‘एआयआयबी’च्या भारताच्या प्रतिनिधी म्हणून बँकेच्या वार्षिक बैठकीत सहभागी होतील. त्या ‘एआयआयबी’च्या अध्यक्षांसोबतच जॉर्डन, स्वित्झर्लंड, अल्जेरिया, सौदी अरेबिया आणि नेपाळ या देशांच्या प्रतिनिधींसोबत इतर महत्त्वाच्या द्विपक्षीय बैठका देखील करणार आहेत.

Advertisement

‘एआयआयबी’मध्ये भारत हा दुसरा सर्वात मोठा भागधारक असल्याने अर्थमंत्र्यांचा हा दोन दिवसीय दौरा जागतिक पायाभूत सुविधा निधी आणि आर्थिक धोरणांसाठी महत्त्वपूर्ण मानला जात आहे. अर्थमंत्री कतार सरकारचे सर्वोच्च नेतृत्व, प्रमुख उद्योगपती आणि गुंतवणूकदारांशीही संवाद साधतील. भारत आणि कतार यांचे ऊर्जा क्षेत्रात घनिष्ठ संबंध आहेत. या भेटीमुळे दोन्ही देशांमधील व्यापार आणि सामरिक भागीदारी अधिक मजबूत होईल.

Advertisement
Tags :

.