अखेर दोन दिवसांच्या घसरणीला विराम!
अंतिम सत्रात सेन्सेक्स 167 तर निफ्टी 64 अंकांनी वधारले : आशियातील मिळत्या जुळत्या वातावरणाचा लाभ
वृत्तसंस्था/ मुंबई
चालू आठवड्यातील अंतिम सत्रात शुक्रवारी भारतीय भांडवली बाजारात मागील दोन दिवसांच्या घसरणीला विराम मिळाला आहे. यामध्ये आशियातील बाजारांमधील मिळता जुळता कल राहिल्याचा फायदा बाजाराला झाल्याचे दिसून आले. बाजारात निर्देशांकांमध्ये मजबूत स्थिती ठेवणाऱ्या कंपन्यांमध्ये बँकिंगच्या समभागांमध्ये खरेदी आणि रिलायन्स इंडस्ट्रीज तसेच आयटीसी यांचे समभाग हे वधारुन बंद झाले.
दिग्गज कंपन्यांच्या मदतीने बीएसई सेन्सेक्स दिवसअखेर 167.06 अंकांनी वधारुन निर्देशांक 71,595.49 वर बंद झाला आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा दिवसअखेर 64.55 अंकांनी वधारुन निर्देशांक 21,782.50 वर बंद झाला आहे.
मुख्य कंपन्यांमध्ये शुक्रवारी सेन्सेक्समधील कंपन्यांमध्ये स्टेट बँकेचे समभाग हे सर्वाधिक म्हणजे 3.55 टक्क्यांनी वधारुन बंद झाला आहे. यासोबतच सनफार्मा, आयसीआयसीआय बँक, अॅक्सिस बँक, टायटन, बजाज फायनान्स, कोटक बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज, आयटीसी यांचे समभाग प्रामुख्याने वधारले आहेत.
अन्य कंपन्यांची स्थिती पाहिल्यास यामध्ये महिंद्रा अॅण्ड महिंद्राचे समभाग हे सर्वात म्हणजे 2.40 टक्क्यांनी प्रभावीत झाले आहेत. यासह भारती एअरटेल, एनटीपीसी, टाटा स्टील, इन्फोसिससह अन्य 14 कंपन्यांचे समभाग हे घसरणीत राहिले आहेत.
का आली तेजी.?
भारतीय बाजारात शुक्रवारच्या सत्रात मजबूत कामगिरी करणाऱ्या कंपन्यांची मदत झाली आहे. यावेळी बँकिंगच्या समभागांच्या तेजीने बाजाराला सकारात्मक उंचीवर नेले. यावेळी रिलायन्स इंडस्ट्रीज आणि आयटीसी यासारख्या मुख्य कंपन्यांचे समभाग हे वधारले. याचा परिणाम म्हणून भारतीय बाजारातील घसरणीला विराम मिळाला आहे.
याच दरम्यान जेफरीज यांनी आयटीसीचे स्टॉकला पहिल्यादा खरेदीतून घट करत होल्ड केले आणि त्याची टार्गेट किंमत कमी करुन 430 रुपये केली आहे.यामुळे मागील केलेली टार्गेट किमत ही 520 रुपये ते 17.3 टक्क्यांनी कमी केल्याची माहिती आहे.