महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

अखेरीस पैलवानांचे ठरले...! पै. चंद्रहार पाटील शिवबंधन बांधणार

02:16 PM Mar 10, 2024 IST | Rohit Salunke
Finally the wrestlers decided...!
Advertisement

डबल महाराष्ट्र केसरी पै. चंद्रहार पाटील शिवबंधन बांधणार : सोमवारी दुपारी मातोश्रीवर पक्ष प्रवेश

Advertisement

प्रतिनिधी/विटा: अखेरीस डबल महाराष्ट्र केसरी पै. चंद्रहार पाटील यांच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील प्रवेशावर शिक्कामोर्तब झाले आहे. याबाबतच्या वृत्ताला पै. चंद्रहार पाटील यांनी दुजोरा दिला असून जिल्हाभरातील कार्यकर्त्यांसह उद्या सोमवारी दुपारी तीन वाजता मातोश्रीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ते पक्ष प्रवेश करणार आहेत. यासाठी जिल्हाभरातून शक्तीप्रदर्शन करीत कार्यकर्ते रवाना होणार आहेत.

Advertisement

गेल्या काही दिवसांपासून डबल महाराष्ट्र केसरी पै. चंद्रहार पाटील यांच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील प्रवेशाच्या चर्चा होत्या. पै. चंद्रहार पाटील हे लोकसभा निवडणुकीसाठी गेल्या वर्षभरापासून तयारी करीत आहेत. बैलगाडा शर्यत, रक्तदान शिबीर महारॅली, गावोगावी संपर्क अभियान राबवून त्यांनी लोकसभा निवडणूकीच्या रिंगणात उतरण्याचा मनसुबा व्यक्त केला होता. त्यासाठी त्यांनी विविध पक्षाच्या नेत्यांच्या भेटीगाटी घेऊन चर्चा केली होती. विशेषतः शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांच्याशी त्यांचा सातत्याने संपर्क होता.

मात्र लोकसभा सांगली मतदारसंघातून तिकीटाची हमी मिळाल्याशिवाय पक्ष प्रवेश करायचा नाही, असा त्यांचा प्रयत्न होता. त्यासाठी त्यांनी पक्ष श्रेष्ठींसोबत दोन-तीन चर्चेच्या फेऱ्या केल्या. मातोश्रीवर भेट देऊन त्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशीही चर्चा केली होती. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते खा. संजय राऊत यांच्यासमवेत देखिल त्यांच्या वारंवार चर्चा होत होत्या. अखेरीस काल शनिवारी पुण्यात त्यांची खा. राऊत यांच्यासमवेत चर्चा झाल्यानंतर पै, चंद्रहार पाटील यांच्या पक्ष प्रवेशावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

त्यानंतर पै. चंद्रहार पाटील यांनी मतदारसंघात परत येऊन पक्ष प्रवेशाच्या तयारीला सुरूवात केली आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख संजय विभूते यांच्यासमवेता चर्चा करीत त्यांनी सोमवारच्या पक्ष प्रवेशाच्या दृष्टीने जिल्हाभरातील कार्यकर्त्यांना संदेश देण्यास सुरूवात केली आहे. सोमवारी सकाळी लवकर मतदारसंघातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते नेऊन शक्तीप्रदर्शन करीत मुंबईकडे रवाना होतील. दुपारी तीन वाजता पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत पै. चंद्रहार पाटील कार्यकर्त्यांसमवेत शिवबंधन हाती बांधणार आहेत.

दरम्यान याबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख संजय विभूते यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनीही पै. चंद्रहार पाटील यांच्या पक्ष प -वेशाच्या वृत्ताला दुजोरा दिला. उद्या दुपारी मातोश्रीवर पै. चंद्रहार पाटील यांचा पक्ष प्रवेश होत आहे. आपण सध्या पै. चंद्रहार पाटील यांच्या समवेत असून दौऱ्याचे नियोजन सुरू आहे, असे विभूते यांनी सांगितले.

सांगलीतून संधी मिळेल

याबाबत पै. चंद्रहार पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. आपण कार्यकत्यांसह शिवसेनेत प्रवेश करीत आहोत. सांगली लोकसभा निवडणूक लढवण्याचा आपला इरादा कायम आहे. शिवसेना पक्षप्रमुखा उद्धव ठाकरे आपल्याला संधी देतील, असा आपल्याला विश्वास आहे, असे पै. चंद्रहार पाटील यांनी याबाबत बोलताना सांगितले.

Advertisement
Tags :
#balasahebthackray#chandraharpatil#kolhapur#marathinews#tarunbharat#vitabreakingnews
Next Article