For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अखेर अगसगेतील ‘त्या’ शाळेचे शौचालय विद्यार्थ्यांसाठी खुले

11:11 AM Aug 03, 2024 IST | Tarun Bharat Portal
अखेर अगसगेतील  ‘त्या’ शाळेचे शौचालय विद्यार्थ्यांसाठी खुले
Advertisement

‘तरुण भारत’ वृत्ताची दखल

Advertisement

वार्ताहर/अगसगे

अगसगे प्राथमिक कन्नड शाळेच्या शौचालयाचे कुलुप दि. 1 ऑगस्टपर्यंत न उघडल्यास कुलुप मोडून काढण्याचा इशारा दलित प्रगतीपर सेनेचे राज्य अध्यक्ष शिवपुत्र मैत्री व सेफ वॉर्ड समुहाचे अध्यक्ष संतोष मैत्री यांनी दिला होता. यामुळे ग्रामपंचायतीचे धाबे दणाणले व संबंधित कंत्राटदाराकडून चावी मागून अखेर शाळेच्या मुख्याध्यापकांना चावी सुपूर्द केली. त्यामुळे ग्रामस्थांसह शिक्षकांतून समाधान व्यक्त होत आहे. एक वर्षापूर्वी कन्नड शाळेला शासनाकडून सुमारे आठ लाख ऊपये निधी शौचालय बांधण्यासाठी मंजूर केला होता. यामधून शौचालय बांधण्यात आले आहे. मात्र अद्याप शौचालय सुरू न करता त्याला कंत्राटदराने कुलूप लावून बंद ठेवले होते. शौचालय बंद ठेवण्यामागचे कारण मात्र अद्याप समजू शकले नाही.

Advertisement

कन्नड व मराठी प्राथमिक शाळा एकाच आवारात आहेत. मराठी शाळेच्या शौचालयमध्ये कन्नड शाळेचे विद्यार्थी देखील शौचालयाला जात आहेत. विद्यार्थ्यांसह शिक्षकांना देखील दररोज नाहक त्रासाला सामोरे जावे लागत होते. शाळा सुधारणा कमिटीने शौचालय त्वरित सुरू करावे म्हणून ग्रामपंचायतीकडे अनेकवेळा मागणी केली होती. मात्र ग्रामपंचायतीने दुर्लक्ष केले होते. ही बाब संतोष मैत्री व शिवपुत्र मैत्री यांना समजताच त्यांनी पीडीओ एन. ए. मुजावर यांना चांगलेच धारेवर धरले होते. यावेळी ग्रामपंचायत काही सदस्यही उपस्थित होते. 1 ऑगस्टपर्यंत शौचालयाचे कुलुप काढून विद्यार्थ्यांना शौचालयास परवानगी न दिल्यास आम्ही स्वत: शौचालयाचे कुलुप तोडून शौचालय सुरू करण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे खडबडून जागे झालेल्या ग्रामपंचायत सदस्यांनी कंत्राटदाराला याबाबत जाब विचारला आणि त्वरित शौचालयाची चावी कंत्राटदाराकडून मागून घेतली आणि कन्नड शाळेचे मुख्याध्यापक पुंडलिक चव्हाण यांच्याकडे सुपूर्द केली.

Advertisement
Tags :

.