For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अखेर येळ्ळूर वेशीतील ‘तो’ ट्रान्स्फॉर्मर हटविला

10:15 AM Mar 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
अखेर येळ्ळूर वेशीतील ‘तो’ ट्रान्स्फॉर्मर हटविला
Advertisement

येळ्ळूर : येळ्ळूर वेशीतील शिवसेना चौक येथे धोकादायक विद्युत ट्रान्स्फॉर्मर होता. कधीही दुर्घटना घडण्याची शक्यता होती. तो ट्रान्स्फॉर्मर रस्त्याच्या बाजुला मागे करून बसवावा, अशी मागणी करण्यात आली. यासाठी ग्राम पंचायत सदस्य रमेश मेणसे यांनी प्रयत्न केले. त्याला यश आले असून तो ट्रान्स्फॉर्मर मागे बसविण्यात आल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे. वेशीतील शिवसेना चौक येथे बऱ्याच वर्षांपासून रस्त्याच्या शेजारीच हा ट्रान्स्फॉर्मर होता. त्यामुळे ये-जा करणाऱ्या वाहनांना किंवा बैलगाडींना देखील धोका निर्माण निर्माण झाला होता. जवळपास तीन वर्षे याचा हेस्कॉमकडे पाठपुरावा करण्यात आला. हेस्कॉमचे अधिक्षक अभियंता प्रवीणकुमार चिकार्डे आणि सेक्शन ऑफीसर लोबो यांनी याची दखल घेवून तो ट्रान्स्फॉर्मर मागे घेतला. याबद्दल रमेश मेणसे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच अधिकाऱ्यांचेही आभार मानण्यात आले.

Advertisement

Advertisement
Tags :

.