महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

अखेर लिलावात गाळा घेतलेल्या भाडेधारकाला दिला ताबा

11:18 AM Apr 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

‘त्या’ गाळ्यातील साहित्य दिले परत

Advertisement

बेळगाव : गणपत गल्ली येथील पुरोहित स्वीटमार्टमधील साहित्य काढून संबंधित मालकाला देण्यात आले आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महानगरपालिकेने रितसर या गाळ्याचा कब्जा घेवून नवीन भाडेकरु यांच्या ताब्यात हा गाळा दिला आहे. दोन वर्षांपासून महानगरपालिका हा गाळा ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत होती. मात्र विविध कारणांनी हे काम रेंगाळले होते. अखेर महानगरपालिकेच्या महसूल विभागाने ही कारवाई पूर्ण केली. महानगरपालिकेचे आयुक्त पी. एन. लोकेश यांच्या मार्गदर्शनानुसार मनपाने पुढील कारवाई केली. शुक्रवारी या गाळ्यामध्ये असलेले फर्निचर, इलेक्ट्रीक साहित्य यासह इतर साहित्य काढण्यासाठी महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी मदत केली. सर्व साहित्य काढून संबंधित मालकाला देण्यात आले. मनपाचे महसूल, सार्वजनिक बांधकाम तसेच इतर विभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना मदत केली असून लिलावात घेतलेल्या पुंडलिक करजगनहट्टी यांच्याकडे गाळ्याचा ताबा देण्यात आला. उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार ही कारवाई केल्याची माहिती महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. जिल्हा न्यायालयापासून उच्च न्यायालयापर्यंत या गाळ्यासंदर्भात न्यायालयीन लढाई लढण्यात आली होती. मनपाच्या कायदा सल्लागार तसेच इतर कर्मचाऱ्यांनी न्यायालयामध्ये पाठपुरावा करून अखेर हा गाळा खाली केला आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article