महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

अखेर मनपाची ऑनलाईन घरपट्टी मार्गी

11:34 AM Apr 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वेबसाईटमधील तांत्रिक अडचण दूर : ऑनलाईन घरपट्टी भरण्यास प्रारंभ

Advertisement

बेळगाव : महानगरपालिकेला ऑनलाईनद्वारेच 70 टक्क्यांहून अधिक कर जमा होतो. मात्र यावर्षी नवीन आर्थिक वर्षाला प्रारंभ होताच ऑनलाईनची समस्या उद्भवली होती. ऑनलाईन वेबसाईट सुरू केली तरी त्यामध्ये तांत्रिक अडचण निर्माण होत होती. त्यामुळे वारंवार ही वेबसाईट बंद पडत होती. गुरुवारी ऑनलाईन वेबसाईटमधील समस्या दूर झाल्याने मनपाची ऑनलाईन घरपट्टी मार्गी लागली आहे. याबाबत तांत्रिक विभागाने यापुढे समस्या उद्भवणार नाही, असे सांगितले आहे. एप्रिल महिन्यामध्ये जर घरपट्टी भरली तर 5 टक्के सवलत दिली जाते. त्यामुळे बहुसंख्य आस्थापनांचे मालक एप्रिलमध्येच कर भरत असतात. मात्र चलन वितरणातील सावळा गोंधळ व ऑनलाईनमधील तांत्रिक बिघाडामुळे यावर्षी सुरुवातीलाच मोठा गोंधळ उडाला. एक तर चलन देताना चुकीचे दिले जात होते. चलन घेण्यासाठी रांगेत ताटकळत थांबावे लागत होते. ऑनलाईन भरायचे म्हटले तर वेबसाईट बंद राहत होती. त्यामुळे करायचे तरी काय? असा प्रश्न साऱ्यांना पडला होता. महानगरपालिकेतील तांत्रिक विभागाने त्यामधील दोष गेल्या तीन दिवसांपासून दूर करण्याचा प्रयत्न केला. अखेर गुरुवारी त्याला यश आले असून आता ऑनलाईन घरपट्टी भरणे सोपे जाणार आहे. ऑनलाईन घरपट्टी सुरू झाली तरी दरवाढीमुळे समस्या निर्माण होण्याची शक्यतादेखील व्यक्त होत आहे. ऑनलाईनद्वारेच मोठ्या प्रमाणात घरपट्टी व व्यावसायिकांचा कर जमा होत असतो. बेळगाव वनच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात हा कर जमा केला जातो.

Advertisement

सवलतीच्या दराने घरपट्टी भरण्यास एक महिना मुदतवाढ द्या : माजी नगरसेवक संघटनेचे मनपा आयुक्तांना निवेदन

एप्रिल महिन्यामध्ये घरपट्टी भरण्यास पाच टक्के सवलत दिली जाते. मात्र महानगरपालिकेकडून योग्यप्रकारे चलन वितरण केले जात नाही. त्याचबरोबर ऑनलाईन सुविधाही बंद होती. त्यामुळे समस्या निर्माण झाली आहे. या महिन्यात घरपट्टी भरणे अशक्य असून आणखी एक महिना सवलत द्यावी, अशी मागणी माजी नगरसेवक संघटनेच्यावतीने महापालिका आयुक्तांकडे करण्यात आली आहे. महानगरपालिकेकडून घरपट्टी आकारण्यासाठी चलनचे वितरण करण्यात येत आहे. ते योग्य प्रकारे होत नाही. त्यामध्ये अनेक चुका आहेत. याचबरोबर घरपट्टी किती टक्के वाढ झाली, हे देखील समजणे अवघड झाले आहे. ऑनलाईनद्वारे घरपट्टी भरून घेताना सर्व्हरडाऊनची समस्या निर्माण होत आहे. त्यामुळे सवलतीच्या दरामध्ये घरपट्टी भरणे अशक्य झाले असून एक महिना अवधी वाढवावा, अशी मागणी होत आहे. यावेळी माजी नगरसेवक संघटनेचे अध्यक्ष शिवाजी सुंठकर, जनरल सेक्रेटरी दीपक वाघेला, शिवनगौडा पाटील, माजी उपमहापौर रेणू किल्लेकर, संजीव प्रभू आदी उपस्थित होते.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article