For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अखेर आलमट्टी धरणाची उंची वाढणार..!

03:01 PM Dec 17, 2022 IST | Rohit Salunke
अखेर आलमट्टी धरणाची उंची वाढणार
Advertisement

प्रतिनिधी / बेळगांव : काही दिवसांपूर्वी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी कृष्णा नदीवरील आलमट्टी धरणाला भेट दिली होती. यावेळी धरणाची उंची ५१९.६ मीटरवरून ५२४ मीटरपर्यंत वाढवण्याचे आश्वासन दिले होते.

Advertisement

आलमट्टी जलाशयाची उंची वाढवण्याचे काम हाती घेण्याची मागणी अनेक वर्षांपासून केली जात होती. आता त्याची अंमलबजावणी करण्यात आली आहे. आलमट्टी धरणाची उंची वाढवण्याच्या प्रकल्पासाठी निविदा मागवल्या आहेत. कृष्णा भाग्य जल निगम लिमिटेडने कृष्णा नदीवर बांधलेल्या आलमट्टी जलाशयावर 26 अतिरिक्त गेट्स तातडीने बसवण्यासाठी आणि सध्याचे लोखंडी दरवाजे काढून टाकण्यासाठी तांत्रिक कौशल्य असलेल्या टीमसाठी निविदा मागवल्या आहेत. आलमट्टी धरणाची उंची ५१९.६० मीटरवरून ५२४.२५६ मीटरपर्यंत वाढविण्याचे काम करण्यात येणार आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.