For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अखेर मुक्काम पोस्ट जेल !

06:04 AM Jan 21, 2026 IST | Tarun Bharat Portal
अखेर मुक्काम पोस्ट जेल
Advertisement

कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेशु कदाचन.. जो जे कर्म करतो त्याला याच जन्मात ते फेडावे लागते. अगदी त्याचप्रकारे हत्या, हत्येचा प्रयत्न, खंडणी, अपहरण, संघटित गुन्हेगारी आयुष्यभर चालवित स्वत:ला गुन्हेगारी क्षेत्राचा बेताब बादशहा समजले जाणाऱ्या अनेक गुंडाचा सध्या मुक्काम पोस्ट जेल आहे.

Advertisement

परिस्थितीने गुन्हेगार बनविले. परिस्थिती असती तर आज तुमच्यासारखा आयपीएस अधिकारी असतो. हे वाक्य आहे एका कुख्यात गँगस्टराचे.. ज्याने पोलीस चौकशीत हे वाक्य उच्चारले. मात्र याच गँगस्टरला परिस्थितीच्या नावाचा फायदा कसा उचलला जातो याचे वास्तव दाखविण्यात आले तेव्हा त्याचे डोके चांगलेच ठिकाणावर आले. जन्माला येताना कोणीही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला येत नाही. बिकट परिस्थितीत देखील अनेकानी मार्ग काढत इतिहास गाजविला आहे. जे परिस्थितीचे रडगाणे गातात त्यांना कष्ट न करता सर्व काही आयते आणि जुजबी पाहिजे असते. मग काही जण गुन्हेगारी क्षेत्राची निवड करतात. काही दिवसांची मज्जा, पण हीच आयुष्यभराची सजा असते याची त्यांना कल्पना नसते. अशावेळी एकदा का पकडले गेले की त्यांचा मुक्काम पोस्ट जेल हे ठरलेलेच आहे.  सध्या अशाच गुन्हेगारांनी देशातील जेल भऊन गेलेली आहेत.

पंजाबी गायक शुभदीप सिंह ऊर्फ सिद्ध मुसेवाला याची (पोलीस संरक्षण असताना) गोळ्या घालून हत्या करणारा लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोई यास राष्ट्रवादी

Advertisement

कॉंग्रेसचे (अजित पवार गट) माजी राज्यमंत्री बाबा सिद्दिकी यांच्या हत्येप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणांनी (एनआयए) अमेरिकेकडून ताब्यात घेतले. अनमोल याला दिल्लीच्या तिहार जेलमध्ये सुरक्षित ठेवण्यात आले आहे. अनमोलविऊद्ध खून, खुनाचा प्रयत्न, अपहरण, खंडणी आदी 20 च्या वर गुह्यांची देशभरात नोंद आहे. अनमोल हा बनावट पासपोर्टवर अमेरिकेच्या वेगवेगळ्या शहरांत राहत होता. राष्ट्रीय तपास यंत्रणांनी पकडलेल्या आरोपीच्या माहितीच्या आधारावर त्याला अमेरिकेत ट्रेस केले आणि तेथील तपास यंत्रणांना माहिती दिली. अनमोलची अमेरिकन पोलिसांनी इमिग्रेशनची कागदपत्रे तपासली असता त्याचा पासपोर्ट बनावट नावाने असल्याचे उघड झाले. अशा ‘फर्जी’ आरोपीला अमेरिकेने भारताच्या ताब्यात दिले. परंतु वर्षभर आता अनमोल तिहार तुऊंगाच्या चार भिंतीत राहणार आहे. देशातील कोणत्याही पोलीस किंवा तपास यंत्रणांना त्याचा ताबा देण्यात येणार नाही. ज्या तपास यंत्रणांना अनमोलची कोठडी हवी आहे, त्यांना ती मिळणार नाही. तपास यंत्रणांनी परवानगी घेऊन तिहार जेलमध्ये जाऊन दाखल गुह्यांबाबत चौकशी करावी असे फर्मान पेंद्रीय गफहमंत्रालयाने जारी केले आहे. त्यामुळे अनमोल बिष्णोई आता तिहार जेलमध्ये सुखेनैव राहणार आहे. याउलट तो आता जेलमध्ये बसून अंडरवर्ल्डची सूत्रे हलविणार आहे. हवा त्याचा तो काटा काढणार आहे.  साबरमती जेलमध्ये त्याचा भाऊ लॉरेन्स सध्या तेच करतो आहे.

अनमोल हा तिहार, तर त्याचा भाऊ लॉरेन्स हा गुजरातच्या अहमदाबादमधील साबरमती कारागफहात गेल्या वर्षभरापासून आहे. त्यालाही त्या जेलमध्ये स्वतंत्र ‘सेल‘ उपलब्ध करून देण्यात आला असून त्यालाही जेलमध्ये शाही वागणूक देण्यात येते.

लॉरेन्स बिश्नोई याने गेल्या दोन वर्षापासून मुंबईत चांगलाच धुमाकुळ घातला आहे. या भुरट्या चोराने प्रसिद्धीसाठी बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खानला टार्गेट केले. एवढेच नाही तर त्याच्या घराबाहेर जाऊन गोळीबार करीत दहशत माजविण्याचा प्रयत्न लॉरेन्सने केला. मात्र लॉरेन्सला मुंबई पोलीस पुऊन उरली. त्याचे शूटर अटेकत घेत लॉरेन्सची चांगलीच जिरविली. मात्र अद्यापही त्याचा ताबा मुंबई पोलिसांना मिळाला नाही. सध्या त्याचा मुक्काम पोस्ट साबरमती जेलमध्ये आहे.

तर एकेकाळी मुंबईचा अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीमापासून वेगळा झालेला. नंतर दाऊदचे हस्तक शोधून त्यांचा गेम करणारा छोटा राजनने जगातील अनेक देशात आपले चांगलेच बस्तान बस]िवले होते. अखेर छोटा राजनला 2015 साली इंडोनेशियाताल बाली येथे अटक करण्यात आली. त्यानंतर त्याला भारतात डिपोर्ट केले तेव्हापासून त्याचाही मुक्काम पोस्ट तिहार जेलमध्ये आहे. मुंबईत अनेक गुन्हे दाखल असताना देखील त्यालाही अद्याप मुंबई क्राईम ब्रँचच्या ताब्यात देण्यात आलेले नाही किंवा त्याची कोणतीही सखोल चौकशी केली गेलेली नाही. जेडेसारख्या मुंबईच्या ज्येष्ठ पत्रकाराला ठार मारण्यासाठी त्याने जो कट रचला तेव्हापासून हा तांत्रिक बाबतीत एक्सपर्ट आहे. मात्र सुरक्षिततेच्या बाबतीत सतर्कता बाळगत त्याचा ताबा देण्यात आला नाही. खरे आहे राजनवर

बँकॉक येथे जीवघेणा हल्ला यापूर्वी दाऊदचा खास हस्तक छोटा शकीलने मुन्ना झिंगाडामार्फत घडवून आणला होता. यामुळे राजनला मुंबईत धोका असू शकतो. यामुळे त्याचा ताबा देण्यात आला नाही.  मात्र सध्या अनेक व्याधींनी राजन त्रस्त असून, त्याच्या कर्माचे फळ त्याला मिळत आहे.

संपूर्ण देशात मुंबईतील जे. जे. हत्याकांड गाजले होते, यातील प्रमुख आरोपी सुभाषसिंग ठाकूर यास मीराभाईंदर वसई-विरार पोलिसांच्या क्राईम ब्रँचने विरारमधील बिल्डर समय चौहान यांच्या हत्येप्रकरणी नुकतेच ताब्यात घेतले आहे. हा गुंडही उत्तर प्रदेशातील फत्तेहगड सेंट्रल जेलमध्ये गेल्या दोन दशकांपासून आहे आणि तेथे तो जनता दरबार भरवतो. दाऊद टोळीतून बाहेर पडून सुभाषसिंग ठाकूर याने स्वत:ची टोळी स्थापन केली आहे. मीरा-भाईंदरपासून अगदी पालघर पट्ट्यापर्यंत या यूपीच्या गुंडांची दहशत आहे. अशा गुंडांना सत्ताधाऱ्यांचा पाठिंबा असल्याने त्यांना जेलमध्ये हवे ते मिळते.

यापूर्वी दाऊदला मारण्यासाठी छोटा राजनची गँग पाकिस्तानात दोन दशकांपूर्वी घुसली होती, परंतु छोटा राजन टोळीचा तो प्रयत्न फसला. आता दाऊद आणि छोटा शकील पाकिस्तानात सक्रिय नाहीत. ते जिवंत आहेत की नाहीत. यावरही कुणी बोलत नाही. लॉरेन्स बिष्णोई, अनमोल बिष्णोई छोटा राजनसारख्या बड्या गुंडांना न्यायालयात हजर केले जात नाही. कुठल्याही पोलीस एजन्सीच्या ताब्यात दिले जात नाही. सुरक्षेचे जरी कारण सांगितले जात असले तरी त्यामागची कारणे वेगळी आहेत.

जे बाहेर राहून करता येत नाही ते त्यांना जेलमध्ये राहून बिनधास्त करता येते. जेलमध्ये काही काळ राहून साक्षीदारांना फोडून आपल्या विऊद्धच्या केसेस कोर्टाकडून संपविल्या जातात.  जेलमधून बाहेर आल्यावर निवडणुकीला उभे राहता येते. आमदार होता येते. अऊण गवळीने तेच केले. तो आमदार झाला. जे. जे. हत्याकांडातील काही आरोपी उत्तर प्रदेशात आमदार झाले. उद्या बिष्णोई बंधू झाले तर कुणी आश्चर्य वाटून घेऊ नये. जेलमध्ये संघटित गुंडांचे साम्राज्य थरकाप उडविणारे असते. जेलरही अशा गुंडांच्या वाटला जात नाहीत. गरीब कैद्यांना तर जेलमध्ये कुणी वालीच नसतो. भटक्या कुत्र्याप्रमाणे त्यांची दयनीय अवस्था असते.

अमोल राऊत

Advertisement
Tags :

.