For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अखेर त्या ‘लखोबा’ला अटक

01:13 PM Apr 07, 2026 IST | Tarun Bharat Portal
अखेर त्या ‘लखोबा’ला अटक
Advertisement

न्यायालयासमोर करण्यात आले हजर : इतर चौघांवरही गुन्हा दाखल

Advertisement

बेळगाव : एका तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्याशी वारंवार शरीरसंबंध ठेवून नंतर तिला धोका दिल्याच्या आरोपावरून शहापूर पोलीस स्थानकात अखेर पाच जणांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. ईश्वरसिंग प्रेमसिंग बडगुज्जर (वय 32) याला पोलिसांनी अटक करून सोमवारी न्यायालयासमोर हजर केले आहे. ईश्वरसिंग, त्याचा भाऊ गुरुचरण प्रेमसिंग बडगुज्जर, राहणार महाद्वार रोड, हरजितसिंग पोथीवाल, राहणार शास्त्राrनगर, ईश्वरसिंगची आई व त्याचा मित्र ओमकार पाटील, राहणार महाद्वार रोड या पाच जणांवर एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

25 वर्षांच्या तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरून रविवारी रात्री एफआयआर दाखल करण्यात आला असून पोलिसांनी ईश्वरसिंगला अटक केली आहे. सोशल मीडिया व एका मैत्रिणीच्या माध्यमातून ईश्वरसिंगबरोबर झालेल्या परिचयाचे रुपांतर प्रेमात झाले होते. त्यानंतर त्या तरुणाचा विश्वास संपादन करून त्याने 160 ग्रॅमहून अधिक सोने, एक आयफोन व 19 लाख रुपये रोख रक्कम तिच्याकडून घेतली होती.

Advertisement

लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी वारंवार शरीरसंबंध ठेवले. घेतलेले पैसे, सोन्याचे दागिने, आयफोन तर परत केला नाहीच. आपल्याशी लग्न करायचे असेल तर 3 कोटी रुपये दे, अशी मागणी केली होती. उर्वरितांनी या प्रकाराला सहकार्य केले होते. शहापूर पोलिसांनी सुरुवातीला एफआयआर दाखल करून न घेता समेटाची भाषा सुरू केली होती. अॅड. मंदाकिनी अप्पुगोळ यांच्या माध्यमातून वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार करताच अखेर एफआयआर दाखल करून घेण्यात आले आहे.

फोटो-व्हिडिओ मीडियावर व्हायरल करण्याची धमका

पुराव्यादाखल काही व्हिडिओ व ऑडिओही पोलिसांना दिले असून ऑडिओतील संभाषण थक्क करणारे आहे. ईश्वरसिंगने पीडित तरुणीच्या घरी जाऊन सर्व पुरावे असलेला तिचा मोबाईल फोडून तिच्यावरही हल्ला केल्याची माहिती मिळाली आहे. पोलिसात फिर्याद दिलीस तर तुला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी देऊन त्या तरुणीसंबंधीचे वैयक्तिक फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याचे सांगत त्याने धमकावले आहे. ही गोष्ट ऑडिओत रेकॉर्ड झाली आहे.

पोलिसांची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात

25 वर्षीय तरुणीकडून घेतलेले 160 ग्रॅमहून अधिक सोन्याचे दागिने बँकेत गहाण ठेवून ईश्वरसिंगने पैसे उचलले होते. त्या तरुणीने आपले दागिने परत मागितल्यावर तिला धमकावल्याचा ऑडिओ उपलब्ध झाला आहे. तरुणीच्या तक्रारीवरून सर्व दागिने पोलीस स्थानकात आणण्यात आले. त्या तरुणीने आपल्या दागिन्यासंबंधीची बिले व कागदपत्रे पोलिसांना दाखवूनही ते आरोपीलाच परत केल्याची माहिती उघडकीस आली आहे. या प्रकरणात शहापूर पोलिसांनी वठवलेली भूमिका संशयाच्या भोवऱ्यात अडकली आहे.

Advertisement
Tags :

.