For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अखेर दोडामार्गात तात्पुरत्या स्वरूपात गटारे बांधून पाण्याचा निचरा

05:26 PM May 28, 2025 IST | अनुजा कुडतरकर
अखेर दोडामार्गात तात्पुरत्या स्वरूपात गटारे बांधून पाण्याचा निचरा
Advertisement

नगरसेवक संतोष नानचे यांनी वेधले होते बांधकामचे लक्ष
बांधकामचे लक्ष

Advertisement

दोडामार्ग – वार्ताहर
छाया – समीर ठाकूर

दोडामार्ग ते आयी मार्गावरील बीएसएनएल ऑफिस ते पिंपळेश्वर चौकापर्यंतच्या मुख्य बाजारपेठेतील रस्त्यावर दोन्ही बाजूंनी गटारे नसल्याने पावसाचे पाणी थेट नागरिकांच्या घरांत घुसत होते. त्यामुळे येणाऱ्या पावसात अजून पावसाच्या हानी होऊ नये यासाठी नगरसेवक संतोष नानचे यांनी शहरवासीयांना सोबत घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता महेंद्र केणी यांचे नुकतेच लक्ष वेधले होते. त्या पार्श्वभूमीवर बांधकाम विभागाने जेसीबीच्या सहाय्याने तात्पुरत्या स्वरूपात गटारे बांधून पाण्याचा योग्य निचरा केला आहे. त्यामुळे शहरवासीयांनी नगरसेवक संतोष नानचे व बांधकाम विभागाचे आभार मानले आहे.

Advertisement

सावंतवाडी येथील बांधकाम विभागाच्या कार्यालयात कार्यकारी अभियंता महेंद्र केणी यांची माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक संतोष नानचे यांच्या नेतृत्वाखाली दोडामार्ग शहरातील या भागातील शिष्ठमंडळाने सोमवारी भेट घेतली होती. यावेळी दोडामार्ग तालुका व्यापारी संघाचे अध्यक्ष सागर शिरसाठ, शाम चांदेलकर, सुधीर चांदेलकर, प्रवीण आरोंदेकर, आशीर्वाद मणेरीकर, फोंडू हडीकर, अनिकेत गावकर, विशांत परमेकर, ओंकार पेडणेकर, विनय पेडणेकर, चंद्रशेखर डेगवेकर, शिवम पांचाळ, आदी उपस्थित होते. गेल्या आठवडा भरापासून कोसळत असलेल्या अवकाळी पावसात बीएसएनएल कार्यालयापासून ते पिंपळेश्वर चौकापर्यंतच्या काही घरांमध्ये व दुकानामध्ये पाणी गेले आहे. त्यामुळे बऱ्याच व्यापाऱ्यांचे व नागरिकांचे अचानक आलेल्या पावसाच्या पाण्यामुळे नुकसान झाले आहे. अवकाळी पडलेल्या पावसात ही परिस्थिती तर अजून संपूर्ण पावसाळा बाकी आहे त्यावेळीही जर असेच पाणी आले तर येथील नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान व अनेक समस्यांना सामोरे जावे लागणार असल्याचे नगरसेवक नानचे यांनी श्री. केणी यांच्या लक्षात आणून दिले होते.

बांधकाम विभागाचे मानले आभार....
सावंतवाडी येथील कार्यालयात वरील सर्वांनी भेट दिल्यानंतर कार्यकारी अभियंता यांनी तात्पुरत्या स्वरूपात जेसीबीच्या सहाय्याने गटारे मारून पावसाच्या पाण्याचा योग्य असा निचरा केला जाईल तुम्ही सर्वजण निश्चिंत राहा असे सांगितले होते. त्यानुसार आज दुसऱ्याच दिवशी त्यांनी तात्पुरत्या स्वरूपात गटारे मारून पाणी जाण्यासाठी वाट केली आहे. बांधकाम विभागाने केलेल्या या कामामुळे त्या भागातील नागरिकांनी समाधान व्यक्त करत बांधकाम विभागाचे व श्री.. केणी यांचे आभार मानले आहेत.

येत्या जुलै मध्ये बंदिस्त गटारांचे काम मंजूर होणार – महेंद्र केणी
संतोष नानचे यांनी या ठिकाणची बंदिस्त गटारे करण्यात यावी अशी मागणी फेब्रुवारी महिन्यात निवेदन देत केली होती. त्या संबंधीचा प्रस्ताव देखील शासन दरबारी पाठविण्यात आला आहे येणाऱ्या जुलै महिन्यात काम मंजूर होणार असून येणाऱ्या काळात बंदिस्त गटारे उभारली जातील. तोपर्यंत पाण्याचा निचरा होण्यासाठी ही गटारे उपयोगी येतील असे बांधकाम विभागाकडून समजण्यात आले आहे.

Advertisement
Tags :

.