महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

अखेर पाच दिवसांच्या घसरणीला विराम!

06:06 AM Jun 01, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

सेन्सेक्समध्ये तेजीची झुळूक : निकालाअगोदर गुंतवणूकदार सावध

Advertisement

वृत्तसंस्था/ मुंबई

Advertisement

भारतीय भांडवली बाजारात चालू आठवड्यातील अंतिम सत्रात शुक्रवारी बीएसई सेन्सेक्स व एनएसई निफ्टी यांचे निर्देशांक वधारुन बंद झाले आहेत. यामुळे मागील सलग पाच सत्रामध्ये राहिलेल्या घसरणीला अखेर पूर्णविराम मिळाल्याचे दिसून आले. मात्र लोकसभेच्या निकालाअगोदर गुंतवणूकदारांनी आपली सावध भूमिका घेतली असल्याचे दिसून आले आहे.

मुख्य कंपन्यांच्या मदतीने बीएसई सेन्सेक्स दिवसअखेर 75.51 अंकांनी वधारुन निर्देशांक 73,961.31 वर बंद झाला आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजारातील निफ्टी 42.05 अंकांच्या तेजीसोबत निर्देशांक 22,530.70 वर बंद झाला आहे.

सेन्सेक्समधील कंपन्यांमध्ये शुक्रवारी टाटा स्टीलचे समभाग हे सर्वाधिक म्हणजे 1.8 टक्क्यांनी वधारुन बंद झाले आहेत. यासह बजाज फायनान्स, एचडीएफसी बँक, पॉवरग्रिड कॉर्प, लार्सन अॅण्ड टुब्रो, आयटीसी, स्टेट बँक यांचे समभाग हे प्रामुख्याने तेजीत राहिले आहेत.

अन्य कंपन्यांमध्ये नेस्ले इंडिया, टीसीएस, मारुती सुझुकी, इन्फोसिस, अॅक्सिस बँक, हिंदुस्थान युनिलिव्हर, एचसीएल टेक, कोटक बँक, टेक महिंद्रा व टायटन यांचे समभाग हे घसरणीसह बंद झाले.

या कारणांमुळे बाजार सावरला

मागील पाच सत्रांची कामगिरी पाहता चालू आठवड्यातील अंतिम सत्रात शुक्रवारीही घसरण राहणार असल्याचे संकेत होते. मात्र बाजारात तेजी राहिल्याने काहीसा दिलासा गुंतवणूकदारांना मिळाला आहे. मात्र सावध भूमिका कायम असल्याचे चित्र आहे.

बाजारात सकारात्मक गोष्टींचा झालेला परिणाम पुढील प्रमाणे

? तोट्याचा प्रवास केल्यानंतरही बँकिंग व तेल क्षेत्रातील समभागात तेजी राहिली होती. याचा फायदा भारतीय बाजाराला झाला.

? दुसरीकडे गुंतवणूकदार लोकसभा निकालाच्या अगोदर आपली रणनीती निश्चित करुन आपली योजना आखत असल्याचे संकेत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या निकालादिवशी गुंतवणूकदार चिंतेत असणार आहेत.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article