Satara News : अखेर कोयना धरणाच्या प्रवेशद्वारावर फलक झळकला
पूर्वी कोयना धरणाला “शिवसागर” असे संबोधले जात असे
कोयनानगर : दहा वर्षांपासून सुरु असलेल्या पाठपुरावाव्याला यश आले असून अखेर कोयना धरणाच्या प्रवेशद्वारावर श्री छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर असा नामफलक लावण्यात आला असून जनतेमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे, असे मत भाजप तालुकाध्यक्ष नंदकुमार सुर्वे यांनी व्यक्त केले.
कोयना धरणाच्या जलाशयाला शिवसागर असे संबोधले जात होते, छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव आदरपूर्वक घेतले जावे यासाठी गेली१० वर्षे स्थानिक जनतेला सोबत घेऊन मागणी करीत होतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या मागणीची दाखल घेत अहवाल मागवला होते.
२६ डिसेंबर २०२५ रोजी मंत्री महोदय यांनी कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक यांना नावात तातडीने बदल करण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार कोयना धरणाचे नाव श्री. छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर करण्यात आले असून तसा फलकही धरणाच्या प्रवेशद्वारावर लावण्यात आला आहे.