महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

अखेर सात दिवसांच्या तेजीला पूर्ण विराम!

07:00 AM Dec 08, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

सेन्सेक्स 132 तर निफ्टी 36 अंकांनी प्रभावीत होत बंद

Advertisement

वृत्तसंस्था /मुंबई

Advertisement

भारतीय शेअर बाजारात मागील सात दिवसांपासून सुरु असलेल्या तेजीच्या प्रवासाला अखेर गुरुवारी पूर्ण विराम मिळाल्याचे दिसून आले. गुरुवारी प्रामुख्याने विदेशी संस्थांच्या गुंतवणूकदारांनी केलेल्या विक्रीचा आणि जागतिक बाजारातील मिळात जुळता कल या कारणामुळे बाजार घसरणीसह बंद झाला आहे. बाजारातील विश्लेषकांच्या मते, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलामधील घसरलेल्या किंमतीमुळे बाजार प्रभावीत राहिला आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेकडून सुरु असणाऱ्या पतधोरण बैठकीचा गुरुवारी दुसरा दिवस पूर्ण झाला आहे. मात्र आजच्या दिवशी सकाळी पतधोरण बैठकीमधील निर्णय सादर करण्यात येणार असून या निर्णयानंतरच बाजाराची दिशा स्पष्ट होणार असल्याची माहिती आहे.

मुख्य कंपन्यांच्या मदतीने बीएसई सेन्सेक्स दिवसअखेर 132.04 अंकांनी प्रभावीत होत निर्देशांक 69,521.69 वर बंद झाला आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा 36.55 अंकांच्या नुकसानीसोबत 20,901.15 वर बंद झाला आहे. बीएसई मिडकॅप निर्देशांक 0.7 टक्क्यांनी, स्मॉलकॅप 0.3 टक्क्यांनी वधारला आहे. दिग्गज कंपन्यांमध्ये सेन्सेक्समधील 12 समभाग हे वधारले आहेत. तर पॉवरग्रिड कॉर्प, अल्ट्राटेक सिमेंट, टायटन, एनटीपीसी आणि स्टेट बँक यांचे निर्देशांक मजबूत राहिले आहेत. 2.43 टक्क्यांनी सर्वाधिक नफा कमाईत पॉवरग्रिडचे समभाग राहिले आहेत. अन्य कंपन्यांमध्ये 18 समभाग हे प्रभावीत राहिले आहेत. यात भारती एअरटेल, हिंदुस्थान युनिलिव्हर, टाटा स्टील, आयटीसी आणि लार्सन अॅण्ड टुब्रो यांचे समभाग हे नुकसानीत राहिले आहेत. यात भारती एअरटेल 2.46 टक्क्यांचा फटका बसला आहे.

जागतिक घडामोडी

आशियातील अन्य बाजारांमध्ये जपनाचा निक्की, हाँगकाँगचा हँगसेंग आणि चीनचा शांघार कम्पोजिट हे नुकसानीत राहिले आहेत. युरोपमधील मुख्य बाजारात फ्रान्सचा सीएसी हा तेजीत व जर्मनीचा डीएएक्स हा नुकसानीत राहिला आहे. लंडनच्या एफटीएसई मध्ये मात्र घसरणीची नोंद केली आहे. अमेरिकन बाजारात बुधवारच्या सत्रात मिळता जुळता कल राहिला होता. जागतिक तेल मानक ब्रेंट क्रूड 1.01 टक्क्यांनी वधारुन 75.05 डॉलर प्रति बॅरेलवर राहिला आहे.

पतधोरण बैठकीचा आज निर्णय :

द्वी मासिक पतधोरण बैठक बुधवारी सुरु झाली असून ती आज शुक्रवारी समाप्त होणार आहे. यामध्ये सदर बैठकीत आरबीआय रेपो दरात वाढ करणार का रेपोदर स्थिर ठेवणार हे पाहावे लागणार आहे. कारण या सर्व निकालावर शेअर बाजारातील गुंतवणूकदारांचा कल निश्चित होणार आहे.

समभाग वधारलेल्या कंपन्या

समभाग घसरलेल्या कंपन्या

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article