For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

न्यूझीलंडविरुद्धचा अंतिम टी-20 सामना आज

07:15 AM Nov 01, 2026 IST | Tarun Bharat Portal
न्यूझीलंडविरुद्धचा अंतिम टी 20 सामना आज
Advertisement

वैभव सूर्यवंशी-कुलदीप यादवला संधीची शक्यता

Advertisement

वृत्तसंस्था, हॅमिल्टन : जरी भारतीय संघ व्यवस्थापन सध्याच्या संघरचनेवर ठाम असले, तरी ऑकलंडमधील दारूण पराभवानंतर आज रविवारी हॅमिल्टन येथे न्यूझीलंडविऊद्ध होणाऱ्या पाचव्या आणि अंतिम टी-20 सामन्यासाठी अंतिम अकरा खेळाडूंच्या निवडीत काही धोरणात्मक बदल करण्याचा विचार केला जाऊ शकतो. भारताकडे 3-1 अशी अभेद्य आघाडी आहे, परंतु पाच सामन्यांच्या या मालिकेत सुऊवातीला वर्चस्व गाजवल्यानंतर जागतिक विजेत्या भारतीय संघाला पराभवाने मालिकेचा शेवट करणे नक्कीच आवडणार नाही.

या पार्श्वभूमीवर संघ व्यवस्थापन वैभव सूर्यवंशीला पुन्हा संघात स्थान देण्याबाबत विचार करू शकते. अशा स्थितीत संजू सॅमसनला बाहेर बसावे लागण्याची शक्यता आहे. सध्या संजू सॅमसनला ड्रेसिंग रूममधील सहकाऱ्यांचा भक्कम पाठिंबा असल्याचे दिसते, परंतु या मालिकेत तो विशेष छाप पाडू शकलेला नाही. श्रेयस अय्यरच्या कामगिरीतही सातत्याचा अभाव दिसून येत आहे, मात्र अलीकडच्या टी-20 मालिकांमध्ये त्याच्या नेतृत्वाखाली संघाने वर्चस्व गाजवल्यामुळे त्याच्या वैयक्तिक कामगिरीतील त्रुटींकडे फारसे लक्ष गेले नाही. हॅमिल्टनमध्ये एक मोठी खेळी साकारून अय्यर नक्कीच आपल्या कामगिरीचे चित्र बदलण्याचा प्रयत्न करेल.

Advertisement

वास्तविक गेल्या काही सामन्यांत नमन धीर आणि नितीशकुमार रे•ाr यांनी डावाच्या उत्तरार्धात केलेल्या आक्रमक फलंदाजीमुळे श्रेयस अय्यरच्या अपयशावर पडदा पडला आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या टी-20 सामन्यात न्यूझीलंडला 200 धावांच्या आत रोखले असले, तरी भारतीय गोलंदाजी विभागातही काही त्रुटी आहेत, ज्या सुधारणे आवश्यक आहे. भुवनेश्वर कुमारच्या बहुचर्चित पुनरागमनानंतरही त्याला अपेक्षित यश मिळालेले नाही. अशा परिस्थितीत बळी मिळवण्यासाठी आणि धावांवर नियंत्रण ठेवण्यासाठी भारतीय संघ प्रामुख्याने अर्शदीप सिंगवर आणि काही प्रमाणात अक्षर पटेलवर अवलंबून राहिला आहे.

नितीश आणि धीर या दोघांनीही आपल्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर भारताच्या तळाच्या फळीला बळकटी दिली आहे, परंतु गोलंदाज म्हणून ते अजूनही पूर्णपणे विश्वासार्ह ठरलेले नाहीत. कुलदीप यादव किंवा वऊण चक्रवर्ती यांना संघात स्थान द्यायचे असेल, तर धीरला बाहेर बसवावे लागेल. याचा अर्थ असा की, फलंदाजीतील काही ताकद आणि कामचलावू ऑफ स्पिन गोलंदाजीचा पर्याय सोडून एका पूर्णवेळ गोलंदाजाला संधी द्यावी लागेल. भारत तिलक वर्मा आणि अभिषेक शर्मा यांचा वापर अतिरिक्त गोलंदाज म्हणून करण्याबाबतही विचार करू शकतो, परंतु या मालिकेतील धावांचा वेग पाहता असे करणे महाग पडू शकते.

आधुनिक क्रिकेटचे स्वरूप असे आहे की, संघ कोणत्याही सामन्याला निरर्थक मानत नाहीत आणि न्यूझीलंडच्या बाबतीतही हेच लागू होते. टी-20 मालिका विजयाने संपवल्यास आगामी पाच सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत ते आत्मविश्वासाने मैदानात उतरू शकतील. नाही तरी या सामन्यापूर्वी शतकवीर ग्लेन फिलिप्स आणि आक्रमक अर्धशतक झळकावणारा मायकल ब्रेसवेल यांच्या कामगिरीमुळे यजमान संघाचा आत्मविश्वास नक्कीच उंचावलेला असेल.

संघ-भारत : श्रेयस अय्यर (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, वैभव सूर्यवंशी, इशान किशन, तिलक वर्मा, अक्षर पटेल, शिवम दुबे, नितीशकुमार रे•ाr, नमन धीर, प्रिन्स यादव, मयंक यादव, अर्शदीप सिंग, भुवनेश्वर कुमार, वऊण चक्रवर्ती, कुलदीप यादव.

न्यूझीलंड : मिचेल सँटनर (कर्णधार), फिन अॅलन, टिम सायफर्ट, बेव्हन जेकब्स, डॅरिल मिचेल, ग्लेन फिलिप्स, डेव्हॉन कॉनवे, मायकेल ब्रेसवेल, नॅथन स्मिथ, ब्लेअर टिकनर, मॅट फिशर, काईल जेमिसन, जेकब डफी, अॅडम मिल्ने, जोश क्लार्कसन.

सामन्याची वेळ : दुपारी 12:30 वा. (भारतीय प्रमाणवेळेनुसार)

Advertisement
Tags :

.